पुढच्या महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून देशामध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. पुढील महिन्यापासून कार्बन मिशन नॉर्म्स (उत्सर्जन मानदंड नियम) लागू करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी त्यांच्या खर्चात कपात करत आहेत. याच कारणामुळे Honda कम्पनी देखील आपल्या Amaze या कारच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. होंडा कंपनी आपल्या या गाडीमध्ये किती रुपयांची वाढ करणार आहे आणि त्यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊयात. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घेतला निर्णय PTI च्या बातमीनुसार Honda Cars India ने आपल्या एंट्री-लेव्हल कॉम्पॅक्ट सेडान Amaze च्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीची किंमत १२,००० रुपयांनी महागणार आहे. पुढील महिन्यापासून उत्सर्जन मानदंड नियम लागू केले जाणार आहेत. यामुळे कंपनीच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच कारणामुळे कंपनीने आपल्या वाहनाच्या किंमती वाढ करण्याचे ठरवले आहे. कंपनीने सांगितले की, मॉडेलच्या वेगवेगळ्या ट्रिम्सची किंमत वेगळ्या पद्धतीने वाढवली आहे. हेही वाचा : Petrol-Diesel Price on 24 March: राज्यातील ‘या’ शहरात पेट्रोल डिझेल महागले; पाहा तुमच्या शहरातील आजचे दर होंडा कार्स इंडियाचे मार्केटिंग अँड सेल्स उपाध्यक्ष कुणाल बहल यांनी PTI शी बोलताना सांगितले की, आम्ही Honda Amaze च्या किंमतीमध्ये १२,००० रुपयांपर्यंत वाढ करत आहोत. या नवीन किंमती १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मध्यम आकाराच्या सेडान सिटी कारची किंमत कमी करत नसल्याचे कंपनीने सांगितले. Honda Amaze- संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सध्या BSVI च्या दुसऱ्या टप्प्यात त्यांची उत्पादने एकत्रित करण्यासाठी काम करत आहे. १ एप्रिलपासून सर्व वाहनांवर ऑन-बोर्ड सेल्फ-डायग्नोस्टिक डिव्हाइस स्थापित करणे आवश्यक आहे. जे रीअल टाइम ड्रायव्हिंग उत्सर्जन पातळीचे निरीक्षण करेल.