Honda ने CB300F ही नवी कोरी डिझाईन नुकतीच भारतीय बाजारात लाँच केली आहे. Deluxe आणि Deluxe Pro व्हर्जन सह CB300F लवकरच शोरूम मध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी बिग विंग डिलरशिप मधून किंवा होंडाच्या अधिकृत वेबसाइटवरून आपण ही बाईक बुक करू शकता.CB300F चे डिझाईन हे दोन ट्रिम प्रकारांसह Hness CB350 प्रमाणेच असेल. Honda CB300F मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक आणि स्पोर्ट्स रेड या तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

डिलक्स प्रो व्हेरियंटमध्ये संपूर्ण एलईडी लाइटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल-चॅनल एबीएस, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC) समाविष्ट आहे.

Honda CB300F नवी कोरी डिझाईन (Photo : Financial Express)

CB300F चे काही खास फीचर्स

  • CB300F ही बाईक 293cc, 4-वाल्व्ह ऑइल-कूल्ड SOHC इंजिनद्वारे समर्थित असेल.
  • या बाईक मध्ये स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स जोडलेले असतील.
  • बाईकला 5-स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉकसह “गोल्ड’ USD फॉर्क्स अपफ्रंट मिळेल.
  • समोर 276mm वर आणि मागील बाजूस 220mm डिस्कमधून ड्युअल चॅनेल ABS सह स्टॉपिंग फोर्स मिळेल.
Honda CB300F नवी कोरी डिझाईन (Photo : Financial Express)

CB300F ची किंमत

Honda ची CB300F बाईक ही २.२६ लाख एक्स शो रूम किंमतीत उपलब्ध आहे तर डिलक्स आणि डिलक्स प्रो व्हर्जन साठी २. २९ लाख रुपये किंमत आहे.

Royal Enfield घेऊन येणार इलेक्ट्रिक बुलेट; एका चार्जिंग मध्ये 150 km धावणार, पहा फीचर्स

होंडा CB300F ला क्लासिक स्पोर्ट्स बाईक लुक आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या KTM ३९० ड्यूक, BMW जी ३१० आर, CB३००आर या बाईकला टक्कर देण्यासाठी होंडाची ही क्लासिक डिझाईन बाजारात दाखल झाली आहे.