scorecardresearch

Honda Activa H Smart ‘की- लेस’ फीचर्ससह झाली लाँच; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Honda News: स्कुटरमध्ये नवीन टेक्नॉलॉजी असल्याचा दावा होंडा कंपनीने केला आहे.

Activa 6G H-Smart Scooter
Activa 6G H-Smart – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

आपल्या रोजच्या कामांसाठी , नोकरीच्या ठिकाणी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची गरज लागते. त्यात फोर व्हीलर आणि टू व्हिलर यांचा समावेश होतो. काही जण सार्वजनिक वाहनांचा जसे की बस आणि अन्य वाहनांचा उपयोग करतात. मात्र जर तुम्ही टू व्हिलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मात्र, बाजारामध्ये अनेक चांगल्या मायलेज देणाऱ्या गाड्या आल्या आहेत.

या वर्षात Honda Motorcycle आणि स्कुटर इंडियाने Activa 6G H-Smart लाँच केली आहे. ही स्कुटर होंडाच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कुटरला Honda Activa H-Smart असे नाव देण्यात आले आहे. हे Activa चे टॉप एन्ड मॉडेल आहे.

हेही वाचा : Coca Cola लवकरच लाँच करणार आपला पहिला स्मार्टफोन; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

नवीन टेक्नॉलॉजीचा वापर

या स्कुटरमध्ये नवीन टेक्नॉलॉजी असल्याचा दावा होंडा कंपनीने केला आहे. यामध्ये ११० सीसीचे PGM-FI इंजिन येते. फ्युएल इंजेक्शन, स्मार्ट टंबल टेक्नॉलॉजी , एसीजी स्टार्टर असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. Honda Activa H-Smart या स्कूटरमध्ये लांब आकाराचे व्हालीबेस, फुटबोर्ड, पासून स्विच आणि DC LED हेडलॅम्प मिळतात. या स्कुटरमध्ये १२ इंचाचे फ्रंट अलॉय व्हील आणि टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन येते.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 26 January: पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी, पाहा तुमच्या शहरातील दर

या स्कुटरमध्ये नवीन स्मार्ट फाईंड फिचर असल्याचा दावा वाहन निर्मात्याने केला आहे. स्मार्ट की चा वापर करून स्कुटरचे इंजिन दोन मीटरच्या आतमध्ये असताना सुरु करता येते. यामध्ये इंजिनला स्टार्ट आणि स्टॉप असा स्विच देखील येतो.

किती असणार किंमत ?

Honda Activa H-Smart स्कुटर तीन ट्रीममध्ये लाँच करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. ही स्कुटर स्टॅंडर्ड, डिलक्स आणि स्मार्ट या तीन ट्रीममध्ये लाँच करण्यात आली आहे. ज्याची किंमत अनुक्रमे ७४,५३६ रु., ७७,०३६ रु. आणि ८०,५३७ रुपये इतकी आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 09:46 IST
ताज्या बातम्या