हिरो आणि होंडा या दोन्ही दुचाकी निर्मिती कंपन्या एकमेकांच्या मोठ्या स्पर्धक मानल्या जातात. दमदार मायलेज देणाऱ्या बाईक निर्मिती कंपन्या, असे त्यांना मानले जाते. सप्टेंबर महिन्यात विक्रीच्या बाबतीत या दोन पैकी कोणती कंपनी आघाडीवर होती, याची माहिती पुढे आली आहे. यात रिटेल विक्रीच्या बाबतीत होंडा मोटरसायकलने जगातील मोठी दुचाकी निर्मिती कंपनी हिरो मोटोकॉर्पला मागे टाकले आहे.

भारत सरकारच्या वानह या संकेतस्थळानुसार, गेल्या महिन्यात होंडाच्या २.८५ लाख दुचाकींची देशभरात नोंदनी झाली आहे. होंडाच्या तुलनेत हिरोच्या केवळ २.५१ लाख दुचाकींची नोंदनी झाली आहे. रिटेल सेलमध्ये होंडाने हिरो कंपनीला पछाडल्याची ही पहिलीच वेळ आहे.

(अबब.. कार ११ लाखांची अन दुरुस्ती किंमत चक्क २२ लाख, कंपनीच्या अंदाजी खर्चाने ग्राहक हैराण)

दरम्यान सप्टेंबर २०२२ मध्ये ५ लाख १९ हजार ९८० दुचाकी आणि स्कुटर विक्रीसाठी उपलब्ध केल्याचे हिरोने शनिवारी सांगितले होते. तसेच हिरोचा नवा इलेक्ट्रिक स्कुटर व्हिडा या महिन्यात लाँच होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही बातमी नक्कीच हिरोसाठी धक्कादायक ठरली असेल.

व्हिडाची किंमत आणि वैशिष्ट्ये

व्हिडाची किंमत १ लाखांच्या जवळपास असण्याचा आंदाज आहे. ही स्कुटर ओला एसवन प्रो, अथर ४५० एक्स, टीव्हीएस आय क्यूब आणि बजाज चेतक या वाहनांना आव्हान देणार आहे. व्हिडामध्ये मिडशीप माउंटेड मोटर असण्याची शक्यता आहे. ही मोटर उच्च कार्यक्षमतेसाठी ओळखल्या जाते. बेल्ट ड्राईव्ह प्रणालीच्या माध्यमातून ही मोटर मागील चक्का फिरवते. सस्पेन्शनच्या बाबतीत वाहनामध्ये १२ इंच व्हिल्ससह पुढे टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे १० इंच व्हिल्ससह स्विंग आर्म युनिट असण्याची शक्यत आहे.

(वाहनातून निघणाऱ्या काळ्या धुराच्या समस्येला गांभीर्याने घ्या, ‘हे’ करा, अन्यथा होईल मोठे नुकसान)

या स्कुटरमध्ये स्वॅपेबल बॅटरी मिळू शकतात. म्हणजे चार्जिंग संपलेली बॅटरी तुम्ही स्कुटरमधून काढून ती बदलू शकता. यामुळे तुम्हाला चार्जिंगसाठी वाट पाहण्याची गरज पडणार नाही.