scorecardresearch

Hero Splendor चे धाबे दणाणले, Honda ने भारतात आणली सर्वात स्वस्त बाईक, मिळेल सहा वर्षांची वॉरंटी

Honda Shine 100cc Launch: होंडाची बाईक एकूण पाच रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Honda Shine 100 launched
Honda Shine 100 लाँच (Photo-financialexpress)

Honda Shine 100cc Launch: दुचाकी उत्पादक कंपनी Honda ने Hero MotoCorp च्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या बाईक Hero Splendor शी स्पर्धा करण्यासाठी भारतात आपली नवीन Honda Shine 100cc सादर केली आहे. तिला १००cc एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर फ्युएल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे.

कंपनीने Honda Shine 100cc बाईक भारतीय बाजारात पाच रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे. यामध्ये लाल पट्टी, निळ्या पट्टीसह काळी, हिरव्या पट्टीसह काळी, सोनेरी पट्ट्यासह काळा आणि राखाडी पट्ट्यासह काळा रंग योजना पर्यायांचा समावेश आहे. कंपनीने शाइन 100 साठी बुकिंग सुरू केले आहे आणि पुढील महिन्यापासून त्याचे प्रोडक्शन सुरू होईल. या बाईकची डिलिव्हरी मे २०२३ पासून सुरू होईल.

(हे ही वाचा : Mahindra Thar पासून Bolero पर्यंत ‘या’ कारवर मिळतोय तगडा डिस्काउंट, होणार बंपर बचत! )

होंडा शाइन 100cc पॉवरट्रेन

या बाईकचे इंजिन ८bhp ची कमाल पॉवर आणि ८.०५Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात ४-स्पीड कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स देण्यात आला आहे. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, फ्रंट कॉउल, सर्व ब्लॅक अलॉय व्हील, प्रॅक्टिकल अॅल्युमिनियम ग्रॅब रेल, बोल्ड टेल लॅम्प आणि स्लीक डिसेंट मफलर बाईकला अधिक चांगले दिसण्यास मदत करतात. या बाईकवर, कंपनीने ६ वर्षांचे विशेष वॉरंटी पॅकेज सादर केले आहे, ज्यामध्ये ३ वर्षांची मानक आणि ३ वर्षांची वैकल्पिक विस्तारित वॉरंटी आहे.

Honda Shine 100cc किंमत

ही बाईक ६४,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 11:14 IST
ताज्या बातम्या