Honda Shine Celebration Edition: भारतातली दुसरी सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी होंडाने भारतीय वाहन बाजारावर मोठी पकड मिळवली आहे. Honda Shine ही भारतातल्या १२५ सीसी बाईक्सच्या सेगमेंटमधील खूप लोकप्रिय बाईक आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या मायलेज बाईक्सच्या लांब रेंजमध्ये १२५ सीसी इंजिन असलेल्या बाईक मोठ्या संख्येने आहेत. त्यातील एक Honda Shine ही बाईक इंजिन, मायलेज आणि डिझाइनमुळे पसंत केली जाते. कंपनीने आत्तापर्यंत Honda Shine चे चार प्रकार बाजारात लाँच केले आहेत, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला आज Honda Shine Celebration Edition बद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला ही बाईक सोप्या फायनान्स प्लॅनद्वारे स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

Honda Shine Celebration Edition किंमत

Honda Shine Celebration Edition ची सुरुवातीची किंमत ७९,९१४ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. या बाईकची ऑन रोड किंमत ९२,५५३ रुपये इतकी आहे. Honda Shine Celebration Edition On Road Price नुसार, तुम्हाला ही बाईक रोख पेमेंटद्वारे खरेदी करण्यासाठी सुमारे ९३,००० रुपये खर्च करावे लागतील, परंतु तुम्ही ही बाईक फायनान्स प्लॅनद्वारे फक्त ११,००० रुपयांच्या डाउन पेमेंटवर मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया Honda Shine Celebration Edition या जबरदस्त बाईकवरील फायनान्स प्लॅन.

mohammed abdul arfath,
एका महिन्यापासून अमेरिकेत बेपत्ता असलेला हैदराबादचा युवक मृतावस्थेत आढळला
Share Market Sensex and Nifty
सेन्सेक्स आणि निफ्टीने रचला नवा इतिहास; बाजार भांडवल पहिल्यांदाच पोहोचले ४०० लाख कोटींवर
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

(हे ही वाचा : Electric Bike: सिंगल चार्जमध्ये १५० किमी रेंज देणारी ‘ही’ जबरदस्त फीचर्सवाली बाईक फक्त २० हजारात आणा घरी)

Honda Shine Celebration Edition Finance Plan

तुमच्याकडे ११,000 रुपये असल्यास, ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, बँक या बाईकसाठी वार्षिक ९.७ टक्के व्याजदरासह ८१,५५३ रुपये कर्ज देऊ शकते. कर्ज मिळाल्यानंतर, तुम्हाला या बाईकच्या डाऊन पेमेंटसाठी ११,००० रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला बँकेने कर्जाची परतफेड करण्यासाठी निश्चित केलेल्या कालावधीत (३ वर्षे) दरमहा २,६२० रुपये मासिक EMI जमा करावा लागेल.

Honda Shine Celebration ‘अशी’ आहे खास

Honda Shine Celebration Edition मध्ये १२३.९४ सीसी चार-स्ट्रोक, एअर-कूल्ड इंजिन आहे जे १०.५ bhp पॉवर आणि ११ Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईक किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्टसह येते आणि कंपनीने यात 5-स्पीड ट्रान्समिशन दिले आहे.  ही बाइक ६५ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देऊ शकते. हे मायलेज एआरएआय प्रमाणित आहे. या बाइकच्या फ्रंट व्हील्समध्ये डिस्क ब्रेक आणि रियर व्हील्समध्ये ड्रम ब्रेक सिस्टिम देण्यात आली आहे. तसेच यामध्ये टुबलेस टायर्स देखील देण्यात आले आहेत.