टू व्हीलर सेक्टरच्या बाईक सेगमेंटमध्ये मायलेज देणार्‍या बाईक्सची मोठी रेंज आहे जी वेगवेगळ्या बजेटमध्ये सहज उपलब्ध आहेत. ज्यामध्ये आम्ही Honda SP 125 बद्दल बोलत आहोत जी किंमत आणि मायलेजसाठी पसंत केली जाते.

या Honda SP 125 बाईकची सुरुवातीची किंमत ८६,४८६ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी ऑन रोड असताना ९९,६५६ रुपयांपर्यंत जाते. तुम्हाला ही बाईक विकत घ्यायची असेल, तर ती खरेदी करण्याचा सोपा फायनान्स प्लॅन येथे जाणून घ्या.

gold and silver Pani Puri
सोने-चांदीची पाणी पुरी! मोदींच्या गुजरातमधील या पाणी पुरीची एकच चर्चा; व्हायरल VIDEO एकदा पाहाच
A unique wedding invitation card from Pune encouraged citizens to exercise their voting rights
लग्नपत्रिका नव्हे! या हटके पत्रिकेतून केली लोकांना मतदान करण्याची विनंती, एकदा क्लिक करून नीट पाहाच
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
do you drink sugarcane juice in summer
Sugarcane : उन्हाळ्यात उसाचा रस पिताय? जाणून घ्या, उसाचे सेवन करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?

ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्हाला ही बाईक फायनान्स प्लॅनद्वारे खरेदी करायची असेल, तर बँक यासाठी ८९,६५६ रुपये कर्ज देईल.

हे कर्ज मिळाल्यानंतर, तुम्हाला १० हजार रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर दरमहा २,८८० रुपये मासिक ईएमआय जमा केले जातील.

आणखी वाचा : नवीन बाईकच्या किंमती वाढल्या आहेत, घाबरू नका, फक्त १५ हजारात Honda Shine घ्या, वाचा ऑफर

Honda SP 125 वर या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ३ वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधीत, बँक वार्षिक ९.७ टक्के दराने व्याज आकारेल.

Honda SP 125 वर उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट आणि EMI प्लॅनचे तपशील जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला या बाईकचे इंजिन, फीचर्स आणि मायलेजचे संपूर्ण तपशील जाणून घ्या.

आणखी वाचा : Best Selling Electric Scooters India: सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप ३ इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत आणि रेंज जाणून घ्या

Honda SP 125 Disc Engine and Transmission
Honda SP 125 च्या इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात १२३.९४ cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन १०.८ PS पॉवर आणि १०.९ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे.

Honda SP 125 Mileage
Honda SP 125 च्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक ४२.२ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. यासोबतच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.