हिरोची स्प्लेंडर आणि एचएफ डिलक्सला लोकांची चांगली पसंती मिळत आहे. तर स्प्लेंडर प्लस ही यापैकी सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी आहे. याची दर महिन्याला लाखो युनिट्सची विक्री होते. आता या दोन्ही दुचाकींना थेट टक्कर देण्यासाठी होंडा आपली नवीन आणि स्वस्त ‘१००’ सीसी दुचाकी आणण्याच्या तयारीत आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० दुचाकींपैकी एक असताना,  होंडा हे भारतीय स्कूटरमध्ये अव्वल नाव आहे. तर हिरो मोटोकॉर्प दुचाकीमध्ये पुढे आहे. स्कूटर बाजारपेठेमध्ये एकट्या होंडा अ‍ॅक्टिव्हाचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे.

तर हिरोची स्प्लेंडर प्लस ही दुचाकी १०० सीसी सेगमेंटमध्येही अव्वल आहे आणि आतापर्यंत तिच्याशी स्पर्धा करू शकणारी दुसरी कोणतीही दुचाकी यावेळी बाजारात उपलब्ध नाही. आता हे लक्षात घेऊन, Honda 2 wheelers India आता आपली नवीन आणि अतिशय परवडणारी १०० सीसी  दुचाकी  सादर करण्याच्या तयारीत आहे.

(हे ही वाचा : Hero Motocorp ‘या’ दिवशी सादर करणार आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर)

होंडाची नवीन कम्युटर मोटरसायकल १०० सीसी इंजिनमध्ये तयार केली जात आहे, कारण आत्तापर्यंत कंपनीकडे फक्त CD 110 Dream आणि Livo सारख्या १०० सीसी इंजिनच्या दुचाकी आहेत, तर १२५ सीसी सेगमेंटमध्ये शाइनला स्पर्धा करणाऱ्या इतर बाइक्स सध्या बाजारात उपलब्ध नाहीत.

कधी होणार सादर

होंडाची आगामी १०० सीसी दुचाकी पुढील वर्षी २०२३ भारतात दाखल होणार आहे. हे देखील कंपनीचे २०२३ चे पहिले मॉडेल असेल. या दुचाकीची किंमत ६०-६५ हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते असे मानले जात आहे. तसेच ही दुचाकी कंपनीची सर्वाधिक मायलेज देणारी देखील ठरू शकते. दुचाकीचे नाव काय असेल याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Hero HF Deluxe आणि Splendor Plus यांच्यात स्पर्धा होईल

होंडाची नवीन १०० सीसी दुचाकी हिरो एचएफ डिलक्स आणि स्प्लेंडर प्लस यांच्याशी थेट स्पर्धा करेल, या दोन्ही एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. अलीकडेच हिरो स्प्लेंडर प्लस नवीन रंगात सादर करण्यात आली आहे.

सणासुदीचा काळ लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल उचलले आहे. हिरो स्प्लेंडर प्लस मध्ये नवीन सिल्व्हर नेक्सस ब्लू कलर सादर करण्यात आला असून या मॉडेलची किंमत ७०,६५८ रुपये ठेवण्यात आली आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर हिरो स्प्लेंडर प्लस मध्ये ९७.२सीसी चे इंजिन आहे. ज्यामध्ये ८०० आरपीएमवर ७.९ bhp आणि ६००० आरपीएम वर ८.०५ एमएम टॉर्क उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने हे वाहन जबरदस्त परफॉर्मन्स आणि उत्तम राइड प्रदान करते. यासोबतच चार मॅन्युअल गिअर्सचा पर्याय आहे.