scorecardresearch

नंबर प्लेटची क्रेझ, त्याने मोजले तब्बल ‘इतके’ कोटी; जगातील सर्वात महागड्या नंबर प्लेटची किंमत वाचाल तर बसेल धक्का!

Worlds Most Expensive Car Number Plate: जगात काही गाड्यांचे नंबर इतके महाग आहेत की, त्याची किंमत ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल.

Car Number Plate
जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट (Photo-pixabay)

Car Number Plate Sells For Rs 27 Crore: प्रत्येकासाठी आपली कार खास असतेच आणि ती आणखी खास दिसावी असं वाटत असतं. बरेच लोक त्यांच्या कारमध्ये बदल करुन ती वेगळी मॉडिफाय करतात. तर बरेचसे लोक वाहनाचा व्हीआयपी क्रमांक खरेदी करतात. हाँगकाँगमधील एका लिलावात लायसन्स प्लेट $३.२ दशलक्ष (२७ कोटी रुपये) बोली लावून विकली गेली. जी शहरातील रेकॉर्डवरील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली ठरली.

हाँगकाँग परिवहन विभागाने “R” लायसन्स प्लेटसाठी ही बोली लावली होती. याआधी २०२१ मध्ये “W” नावाच्या लायसन्स प्लेटचा २६ मिलियन डॉलर (२०८ कोटी रुपये) मध्ये लिलाव झाला होता. हाँगकाँगमध्ये वैयक्तिक कार प्लेट प्रणाली २००६ पासून कार्यरत आहे, १६० हून अधिक लिलाव आणि ४०,००० हून अधिक प्लेट नोंदणींद्वारे HK नंबर प्लेटसाठी $६०० दशलक्ष पेक्षा जास्त गोळा केले गेले आहेत.

हे ही वाचा << प्रगत फीचर्स, अद्ययावत इंजिन, अन् जबरदस्त लूकसह यामाहाने लाँच केल्या ४ नव्या बाईक्स

वाहन मालक त्यांच्या पसंतीच्या लायसन्स प्लेट्ससाठी अर्ज करण्यासाठी नोंदणी करू शकतात, प्लेट लिलाव कधीकधी १८ महिन्यांपर्यंत चालतात. अर्जदारांना लिलावात समाविष्ट करण्यासाठी ठेव म्हणून $५,००० भरावे लागतात आणि इतर कोणीही बोलीदार नसल्यास, त्या ठेवीसाठी प्लेट त्यांची असेल.

अहवालात एका सरकारी विधानाचा हवाला देण्यात आला आहे ज्यात दावा केला आहे की R अक्षर असलेल्या नंबर प्लेटसाठी विजयी बोली राखीव किंमतीच्या ५,१०० पट आणि लिलावात जमा झालेल्या एकूण रकमेच्या ८० टक्क्यांहून अधिक होती. मात्र, २७ कोटी रुपयांची ही सिंगल लेटर नंबर प्लेट जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट असणार नाही.

हे ही वाचा << कार चोरीचे टेन्शन सोडा, ‘या’ डिव्हाइसमुळे अवघ्या २.५ तासात सापडली ४५ लाखांची चोरीला गेलेली कार

जगातील सर्वात महागड्या नंबर प्लेट

  • ‘MM’ – १८८ करोड
  • ‘F1’ – १५४ करोड
  • ‘New York’ – १५४ करोड
  • ‘D5’- ७४ करोड
  • ‘AA8’ – ७२ करोड
  • ‘1’ – ७३ करोड
  • ’09’ – ५१ करोड
  • ‘7’- ३० करोड

भारतातील विशेष नंबर प्लेट्सचे नियम

चंदीगड नोंदणी आणि परवाना प्राधिकरणाने आयोजित केलेल्या लिलावात, ३७८ दर्जेदार नोंदणी क्रमांक १.५ कोटी रुपयांना विकले गेले; जाहिरात एजन्सीचे मालक ब्रिज मोहन यांनी “CH01-CJ-0001” या क्रमांकासाठी ५००,००० रुपयांच्या सुरुवातीच्या बोलीसह १५.४४ लाख रुपये दिले. ब्रिज मोहनने ही लायसन्स प्लेट त्याच्या नवीन वाहनासाठी विकत घेतली जी त्याने दिवाळीच्या हंगामात २०२२ मध्ये खरेदी केली होती.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 11:33 IST