Maruti Baleno Base Model Finance Plan: कार सेक्टरमध्ये मोठ्या संख्येने प्रीमियम हॅचबॅक कार आहेत आणि या प्रीमियम हॅचबॅक त्यांच्या स्टायलिश डिझाइन आणि त्यांच्या किमतीच्या टॅगशिवाय वैशिष्ट्यांमुळे पसंत केल्या जातात. ज्यामध्ये आम्ही मारुती सुझुकी बलेनोबद्दल बोलत आहोत, जी आपल्या किंमती, डिझाइन वैशिष्ट्ये आणि मायलेजमुळे बाजारात मजबूत पकड राखत आहे. मारुती सुझुकी बलेनो ही फेब्रुवारी २०२३ ची सर्वाधिक विक्री होणारी कार देखील बनली आहे. आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी बलेनो फायनान्स प्लॅनद्वारे स्वस्तात कसे खरेदी करता यईल, याविषयी माहिती देणार आहोत.

Maruti Suzuki Baleno किंमत

आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी बलेनोच्या बेस मॉडेल सिग्माबद्दल सांगत आहोत, ज्याची प्रारंभिक किंमत ६,५६,००० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ही किंमत ऑन-रोड झाल्यानंतर ७,४६,९२० रुपयांपर्यंत जाते.

Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला
india second highest gst collection at 1 78 lakh crore in march
मार्चमध्ये दुसरे सर्वाधिक १.७८ लाख कोटींचे जीएसटी संकलन; आर्थिक वर्षात एकूण संकलन उद्दिष्टापेक्षा सरस २०.१८ लाख कोटींवर
13 thousand houses sold in mumbai marathi news
मुंबई: मार्चमध्ये १३ हजारांहून अधिक घरांची विक्री, मुद्रांक शुल्कापोटी सरकारच्या तिजोरीत १०६६ कोटी रुपयांची भर

(हे ही वाचा : ‘या’ मारुती कारसमोर क्रेटा पडली फिकी, एकदा विकत घेतल्यास १५ वर्षांपर्यंत राहा टेन्शन फ्री! किंमत १२.५० लाख )

Maruti Suzuki Baleno फायनान्स प्लॅन

तुम्हाला रोख पेमेंटद्वारे Marut Suzuki Baleno खरेदी करण्यासाठी ७.४७ लाख रुपयांची आवश्यकता असेल, परंतु बजेट कमी असल्यास, तुम्ही येथे नमूद केलेल्या डाउन पेमेंट आणि EMI प्लॅनद्वारे ५० हजार रुपये भरून हा हॅचबॅक घरी नेऊ शकता.

तुमचे बजेट ५०,००० रुपये असेल आणि तुम्ही मासिक EMI भरण्यास सक्षम असाल, तर डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार ऑनलाइन फायनान्स प्लॅनचे तपशीलवार, बँक या कारसाठी ६,९६,९२० रुपयांचे कर्ज देऊ शकते.

Maruti Suzuki Baleno डाउन पेमेंट आणि EMI

Maruti Suzuki Baleno च्या बेस मॉडेलवर कर्ज मंजूर केल्यानंतर, तुम्हाला ५०,००० रुपये डाउन पेमेंट करावे लागेल आणि त्यानंतर बँकेने ठरवल्यानुसार ५ वर्षांच्या कालावधीसाठी १४,७३९ रुपये प्रति महिना EMI भरावे लागेल.