ओला इलेक्ट्रिकने त्याची एस१ इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केल्यानंतर लगेचच भारतीय इलेक्ट्रिक चारचाकी सेगमेंटकडे लक्ष दिले आहे. तथापि, कंपनीला त्याच्या एस१ इलेक्ट्रिक स्कूटरची गुणवत्ता, विश्वासार्हता, सुरक्षितता आणि वितरण टाइमलाइनबाबत अनेक तक्रारी येत असल्या तरी त्याच्या आगामी इलेक्ट्रिक कारची तयारी जोरात सुरू आहे. एक टीझर देखील लाँच करण्यात आला आहे, ज्यावरून हे स्पष्ट होते की ओला आता इलेक्ट्रिक कार तयार करत आहे. पण, ओला इलेक्ट्रिक स्कुटरच्या अनेक अपघातांनंतर ओला इलेक्ट्रिक कार कितपत सुरक्षित असेल, असा प्रश्न पडतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Car Care Tips for Rainy Season: पावसाळ्यात तुमच्या गाडीची घ्या खास काळजी; ‘या’ टिप्सची होईल मदत

ओला इलेक्ट्रिकला बाजारातील स्पर्धेशी टक्कर द्यायची असेल, तर ही कार किती सुरक्षित हे दाखवून देणे आणि तिच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असेल. कारण अलीकडच्या काळात ओला इलेक्ट्रिकला एस१ इलेक्ट्रिक स्कूटरशी संबंधित अनेक तक्रारींचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

CNG Vs Petrol : सीएनजी कार पेट्रोल कारपेक्षा जास्त फायदेशीर कशा? जाणून घ्या फायदे

त्याच्या पॉवरट्रेन कॉन्फिगरेशनबद्दल आत्तापर्यंत कोणालाच जास्त अंदाज नाही. तथापि, काही अहवालांनुसार, कारच्या प्रत्येक चाकावर एक मोटर असू शकते आणि याला सुमारे ६०-८० केडब्ल्यूएच क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. मोठ्या बॅटरी पॅकमुळे, ते ५०० किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते तर त्याचा टॉप स्पीड १५० किमी/ता पेक्षा जास्त असू शकतो. बाजारात, ते टाटा, किआ, महिंद्रा, ह्युंदाई सारख्या प्रमुख ओईएम खेळाडूंशी स्पर्धा करेल, जे भारतात आणखी नवीन एव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How safe is the car after ola electric scooter learn the details pvp
First published on: 21-06-2022 at 12:08 IST