How To Stop Vomiting While Travelling In Car: अनेकांना लांबचा प्रवास करायला फार आवडते. पण नेहमीच अनेकांना प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे ते अस्वस्थ होतात. मग अशा परिस्थितीत प्रवासाची सगळी मजाच खराब होऊन जाते. या त्रासामुळे अनेक वेळा अशा लोकांना कुठंही जायला आवडत नाही. वैद्यकीय भाषेत या आजाराला मोशन सिकनेस म्हणतात. मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, जहाज, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. मोशन सिकनेसमुळे लोकांच्या प्रवासादरम्यान उलट्या थांबत नाहीत. 

प्रवासावेळी तुम्हाला उलटी येऊ नये, यासाठी काही खास टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत. तुम्हाला जर प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल आणि प्रवासात उलट्या करून स्वतःला आणि इतर सहप्रवाशांना होणाऱ्या त्रासापासून वाचवायचं असेल तर खाली दिलेल्या काही सोप्या टिप्स फॉलो करा.

Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

(हे ही वाचा : कार, बसमधून प्रवास करताना उलट्या का होतात माहितेय का? ‘हे’ आहे यामागील खरं कारण )

प्रवासात ‘या’ महत्त्वाच्या टिप्स फाॅलो करा

  • अन्न योग्य पद्धतीने खावे: जेवल्यानंतर लगेच गाडीतून प्रवास करू नये. जेवण करण्यापूर्वी आणि जेवणानंतर काही काळ थांबावे. हलके अन्न खाल्ल्याने उलट्यांचा धोका कमी होतो.
  • अन्न काळजीपूर्वक निवडा: अन्न काळजीपूर्वक निवडा. तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
  • भरपूर पाणी प्या: कारमध्ये उलट्यांचा धोका कमी करण्यासाठी जेवणासोबत पाण्याचे सेवन वाढवा. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, ज्यामुळे उलट्यांचा धोका कमी होतो.

बाजारात अशी अनेक औषधे आहेत, जी तुम्ही प्रवास सुरू करण्यापूर्वी घेऊ शकता. याची काही उदाहरणे Vomikind आणि ondem md 4 आहेत. तथापि, कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावे.

कारमधून प्रवास करताना मोबाईल फोन वापरणे टाळा. मागे बसण्याऐवजी पुढच्या सीटवर बसले तर बरे होईल.

जर तुम्हाला सकाळी प्रवास करायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे, धणे आणि बडीशेप भिजवा आणि सकाळी सेवन करा. प्रवासात उलट्या होणार नाहीत.

कारमध्ये बसल्यावर एसीऐवजी खिडकी उघडी ठेवून फ्रेश हवा घ्या.

(टीप: वरिल माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)