scorecardresearch

Premium

ह्युंदाई कंपनीची ‘स्मार्ट केअर क्लिनिक मोहीम!’ ग्राहकांसाठी असणार ‘या’ खास ऑफर; जाणून घ्या…

ह्युंदाईच्या स्मार्ट ऑफर २९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत उपल्बध असणार आहेत .

Hyundai Companys Smart Care Clinic Campaign for 10 day special offer for customers
(फोटो सौजन्य: @Financial Express ) ह्युंदाई कंपनीची 'स्मार्ट केअर क्लिनिक मोहीम!' ग्राहकांसाठी असणार 'या' खास ऑफर; जाणून घ्या…

ह्युंदाई मोटार्स एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी कायम नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. तर आता कंपनी ग्राहकांसाठी खास काहीतरी घेऊन येत आहे. ह्युंदाईने (Hyundai) ‘स्मार्ट केअर क्लिनिक मोहीम’ (Smart Care Clinic campaign) सुरू केली आहे. दहा दिवसांचा देशव्यापी कार्यक्रम ग्राहकांसाठी सुरू केला आहे. या मोहिमेमध्ये ऑफर्स असणार आहेत. ‘स्मार्ट केअर क्लिनिक मोहीम’ ह्युंदाई कारची वर्षभर देखभाल करणाऱ्या आणि ड्राइव्हचा आनंद घेणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा एक उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कंपनीला ग्राहकांमध्ये नियमित सेवेबाबत जागरूकता वाढवायची आहे म्हणून ही मोहीम राबवली जाते आहे. ह्युंदाईच्या स्मार्ट ऑफर २९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत उपल्बध असणार आहेत .

ह्युंदाई स्मार्ट केअर क्लिनिक लाँच करताना, ह्युंदाई मोटार इंडिया एलटीडीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) तरुण गर्ग म्हणाले, “ह्युंदाई मोटार इंडियासाठी २०२३ हे वर्ष अगदीच खास ठरले. आमची सर्वात नवीन गाडी एसयूव्ही एक्सटरने (SUV – Exter) बाजारात प्रचंड स्थान मिळवून दिले. तसेच गाडीला सुमारे एक लाख (100,000) बुकिंगसह जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

Leica working On Leica look For Xiaomi 14 series for smartphones iconic camera
‘या’ कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये दिला जाणार Leica चा आयकॉनिक कॅमेरा; पाहा काय असणार खास
Samsung launched Galaxy Fit3 fitness tracker in India claimed battery life thirteen days With Reasonable Price
स्वस्त स्मार्टवॉच कंपन्यांना सॅमसंगची टक्कर! गॅलॅक्‍सीचा नवीन फिटनेस ट्रॅकर लाँच; पाहा जबरदस्त फीचर्स
mutual fund analysis, Invesco India Large Cap Fund, investment
Money Mantra : फंड विश्लेषण – इव्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंड
Honor X9b launched in India with anti drop display Check Feature Specification and price
Honor चा ‘हा’ नवीन स्मार्टफोन भारतात लाँच; १०८MP कॅमेरा अन् ग्राहकांसाठी खास ऑफर्स, पाहा किंमत…

हेही वाचा…दमदार इंजिन अन् हायटेक फिचर्सच्या भारतातील टॉप पाच स्वस्त बाइक्स!

आयओएनआयक्यू५ (IONIQ 5) लादेखील २०२३ च्या सुरुवातीस लाँच झाल्यापासून आतापर्यंत हजार (1000) हून अधिक वाहने विकून आश्चर्यकारक प्रतिसाद मिळाला आहे. तसेच या खास गोष्टीत आणखी भर घालताना, आमच्या प्रिय ग्राहकांना उपयोगी ‘ह्युंदाई स्मार्ट केअर क्लिनिक’ मोहीम जाहीर करताना आम्हाला खूप जास्त आनंद होत आहे. ह्युंदाई हा कायमच ग्राहकांचा आवडता ब्रँड राहिला आहे, असे तरुण गर्ग म्हणाले आहेत.

ह्युंदाई स्मार्ट केअर क्लिनिक ग्राहकांसाठी पुढील ऑफर घेऊन आली आहे :

जर तुम्ही Hyundai चे ग्राहक असाल आणि त्यांची कार वापरत असाल, तर तुम्ही या उपक्रमांतर्गत ऑफरचा लाभ घेऊ शकता. यात तुम्हाला मोफत ७०-पॉइंट तपासणी (Free 70-point checkup), मेकॅनिकल पार्ट्सवर १०% टक्के सूट तसेच यांत्रिक कामगारांना २०% पर्यंत सूट मिळणार आहे. व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंगवर १५टक्के सूट, इंटिरियर आणि एक्सटेरिअरवर (Interior & Exterior beautification) २० टक्के सूट, ड्राय वॉशवर २० टक्के सूट आदी ऑफर ग्राहकांना मिळणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hyundai companys smart care clinic campaign for 10 day special offer for customers asp

First published on: 26-11-2023 at 16:18 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×