Hyundai कंपनी एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार्सचे व्हर्जन किंवा मॉडेल्स लॉन्च करत असते. जमध्ये नवनवीन फीचर्स समाविष्ट केलेले असतात. गेल्याच महिन्यात कंपनीने आपली नवीन जनरेशन Verena लॉन्च केली आहे. Hyundai कंपनी एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार्सचे व्हर्जन किंवा मॉडेल्स लॉन्च करत असते. जमध्ये नवनवीन फीचर्स समाविष्ट केलेले असतात. गेल्याच महिन्यात कंपनीने आपली नवीन जनरेशन Verena लॉन्च केली आहे. आता कंपनी येत्या काही महिन्यांत देशात नवीन मायक्रो SUV Exter सादर करणार आहे. या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

ही नवीन मायक्रो एसयूव्ही कंपनीच्या K1 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ज्यावर दुसऱ्या जनरेशनची Hyundai Santro देखील आधारित होती. याला २४५० mm चा व्हीलबेस मिळू शकतो. या कारची लांबी ३.८ मीटर इतकी असण्याची शक्यता आहे.

Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
How To Make Kharvas At Home With 1 Cup Milk Without Chikacha Dudh
१ वाटी दुधात बनवा विना चिकाचा खरवस; ‘ही’ सिक्रेट पेस्ट वाचवेल वेळ, मास्टरशेफचा स्पर्धक सॅमची रेसिपी, पाहा Video
Samsung launch of A Series Galaxy A55 5G and Galaxy A35 5G with awesome innovations With Offers
यूट्यूब प्रीमियम अन् आकर्षक ऑफर्ससह ‘या’ कंपनीच्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये एंट्री; जाणून घ्या किंमत

हेही वाचा : प्रतीक्षा संपली! MG मोटरने सुरू केले ‘या’ सर्वात लहान कारचे उत्पादन; १९ एप्रिल रोजी होणार लॉन्च, किंमत फक्त…

कसे असणार डिझाईन ?

नवीन Hyundai Exter ची लांबी सुमारे ३.८ मीटर असणार आहे. जी Casper SUV च्या लांबीपेक्षा थोडी जास्त आहे. नवीन मॉडेल लूकच्या बाबतीत ह्युंदाई कॅस्परपेक्षा बरेच वेगळे असेल. त्याचे काही डिझाइन व्हेन्यूसारखे असू शकतात. इंटिग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प, आयताकृती-आकाराचे प्रोजेक्टर हेडलॅम्प युनिट आणि एच-आकाराचे टेल-लॅम्प्स, शार्क फिन अँटेनासह सिग्नेचर Hyundai ग्रिल मिळणे अपेक्षित आहे. साइड प्रोफाईलमध्ये फॉक्स क्लॅडिंगसह व्हील आर्च मिळण्याची शक्यता आहे.

लवकरच लॉन्च होणार Hyundai Exter- (image Credit-financial Express)

इंजिन

नवीन ह्युंदाई EXTER मध्ये १.२ लिटरचे ४ सिलेंडर असलेले NA पेट्रोलचे इंजिन मिळेल. जे ८१ बीएचपी ची पॉवर आणि ११४ एनएम इतका टॉर्क जनरेट करते. यामध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि MMT चा पर्याय मिळतो. यामध्ये ग्राहकांना CNG पॉवरट्रेनचा पर्याय देखील मिळणार आहे. त्यामध्ये १.० लिटरचे ३ सिलेंडरचे टर्बो पेट्रोल इंजिन मिळते.

हेही वाचा : वाढत्या मागणीमुळे Kia India च्या ‘या’ कारचे बुकिंग कंपनीने पुन्हा केले सुरू; जाणून घ्या किती देणार मायलेज

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी ऑगस्ट २०२३ पर्यंत नवीन Exter SUV लॉन्च करू शकते. ही कार बाजारात या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार टाटा पंचशी स्पर्धा करेल. यासोबतच रेनॉ किगर आणि निसान मॅग्नाईटशीही स्पर्धा होईल.