Hyundai Exter new variants launched: Hyundai मोटर्स नवनवीन गाड्या लाँच करत ग्राहकांना खूश करत असते. आता Hyundai मोटर्स मायक्रो एसयुव्ही एक्सटरचे दोन नव्या प्रकारात लाँच करत आहे. या एसयुव्ही रेंजला एक्सटेंड करण्यात आले आहे. पहिला प्रकार S+ (AMT) आणि दुसरा प्रकार S(O)+ (MT) आहे आणि यात इलेक्ट्रॉनिक सनरूफला फ्लॅगशिप फिचर म्हणून समाविष्ट केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून एसयुव्ही कार्सची मागणी वाढत आहे अशात Hyundai मोटर्सनी बाजारात आणलेल्या मायक्रो एसयुव्ही एक्सटरचे दोन नव्या प्रकाराने सध्या ग्राहकाचे लक्ष वेधून घेत आहे.ऑटो मार्केटमध्ये Hyundai च्या Hyundai Exter एसयूव्हीला मोठी मागणी असून Hyundai च्या लाइनअपमध्ये Exter खूप लोकप्रिय झाले आहे. Hyundai Exter ही कार EX, EX(O), S, S(O), SX, SX(O) आणि SX(O) या सात प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. आता आणखी दोन नवीन प्रकार आले आहेत. या दोन्ही प्रकाराची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊ या

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती, स्कॉर्पिओ, टोयोटा इनोव्हा, बोलेरोला ही टाकले मागे
Kia launches Sonet Gravity| Kia Sonet Gravity Price Features Engine in Marathi
Kia launches Sonet Gravity: गणेशोत्सवात कार घ्यायचीय? KIAने केली सोनेट ग्रॅव्हिटी लॉंच, किंमत वाचून व्हाल थक्क
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…

Hyundai Exter च्या नवीन प्रकाराची किंमत किती आहे?

Hyundai Exeter च्या पहिल्या नवीन व्हेरिट S+ (AMT) ची सुरुवातीची किंमत ७ लाख ८६ हजार आणि S(O)+ (MT) ची सुरुवातीची किंमत ८ लाख ४४ हजार आहे. या दोन्ही किंमती (एक्स-शोरूम) च्या आहेत.

हेही वाचा : No Objection Certificate (NOC) : गाडी विकायची आहे? मग आरटीओकडून एनओसी प्रमाणपत्र कसे काढावे? जाणून घ्या, ऑनलाइन अन् ऑफलाइन प्रक्रिया

Hyundai Exter च्या प्रकारांमध्ये कोणते गोष्टी नवीन फीचर्स आहेत?

या नवीन प्रकारांमध्ये कलर TFT मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID), अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay सह ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिअर AC व्हेंट्स, पावर विंडो, LED DRLs , फ्रंट आणि रिअर स्किड प्लेट्स, हेडलॅम्प एस्कॉर्ट फंक्शन, फ्लोर मॅट्स इत्यादी फीचर्स दिसून येतील.

Hyundai ने एक्सटरला सहा एअरबॅग, सर्व सीटांसाठी ३ पॉइंट सीटबेल्ट, डे आणि नाइट IRVM, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम – हायलाइन, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC), वेहिकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट (VSM), बर्गलर अलार्म, ABS बरोबर EBD, इम्पॅक्ट-सेंसिंग ऑटो डोअर अनलॉक आणि इमरजेंसी स्टॉप सिग्नल (ESS) इत्यादी सुविधा दिल्या आहेत ज्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

एक्सटरच्या बाहेरच्या भागात एक स्किल ब्लॅक मॅश रेडिएटर ग्रिल, प्रोजेक्टर हेडलाइट्स, आणि एक खास एच शेप्ड एलइडी डिआरएल आहे. गाडीच्या कडेवर ब्लॅक पॅनल आणि डायमंड कट पॅटर्नचे एलॉय चाक आहे जे दिसायला अतिशय आकर्षक दिसतात. एसयुव्हीमध्ये स्पोर्टी रूफ स्पॉयलर, शार्क फिन एंटीना आणि रिअर वायपर आहे.

हेही वाचा : Tata Curvv की Hyundai Creta? किंमत आणि फीचर्समध्ये कोणी मारली बाजी? जाणून घ्या

इंजिन स्पेसिफिकेशन

Hyundai Exeter मध्ये 1.2 लीटर सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड (NA) पेट्रोल इंजिन आहे जे ६०००rpm वर ८२ bhp आणि ४०००rpm वर ११३.८Nm चा पीक टॉर्क आउटपुट देतात. एक प्रकार हा ५-स्पीड मॅन्युअल आणि दुसरा AMT गिअरबॉक्ससह आहे.