Hyundai Ioniq 5 Ev: जानेवारी महिन्यामध्ये भारतात ऑटोमोबाइल क्षेत्रातील ‘ऑटो एक्सपो’ (Auto Expo) हा मोटरशो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये ह्युंदाई कंपनीने त्यांची अनेक उत्पादने सादर केली होती. त्यांच्या प्रॉडक्ट रेंजमधील Hyundai Ioniq 5 EV या इलेक्ट्रिक कारने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. भारतामध्ये या इलेक्ट्रिक कारच्या डिलीव्हरीला सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. ऑटो एक्सोमध्ये लॉन्च करताना या गाडीची किंमत ४४.९५ लाख आहे हे ह्युंदाई कंपनीने स्पष्ट केले होते. पण काही कालावधीनंतर त्यांनी किंमतीमध्ये १ लाख रुपयांची वाढ केली. यानुसार आता Hyundai Ioniq 5 EV घेण्यासाठी ग्राहकांना ४५.९५ लाख मोजावे लागणार आहेत.

Hyundai Ioniq 5 EV – बुकींग आणि डिलीव्हरी

मागील २ महिन्यांमध्ये ह्युंदाई कंपनीची ही नवी इलेक्ट्रिक कार ६५० पेक्षा जास्त लोकांनी बुक केली आहे. बऱ्याच ग्राहकांनी ही अत्याधुनिक गाडी ऑनलाइन पद्धतीने बुक करण्यावर भर दिली आहे. लॉन्च केल्यानंतर गाडीची बुकींग करणाऱ्या ५०० ग्राहकांसाठी कंपनीने ऑर्फर ठेवली होती. या ऑर्फरनुसार त्यांना गाडीसाठी ४४.९५ लाख रुपये खर्च करावे लागणार होते. पुढे कंपनीद्वारे गाडीची किंमत एक लाख रुपयांनी वाढवण्यात आली. नुकतीच या गाडीच्या डिलीव्हरीला सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा – Creta, Seltos चा खेळ खल्लास? देशात दाखल झाली ७ सीटर SUV कार, मोठ्या कुटुंबासाठी फेव्हरेट

Hyundai Ioniq 5 EV मधील खास फीचर्स

Hyundai Ioniq 5 EV या नव्याकोऱ्या गाडीमध्ये 72.8 kWh लिथियम-आयन बॅटरी आहे, ही इलेक्ट्रीक गाडी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ६३१ किमीपर्यंत (ARAI- सर्टिफाईड) चालू शकते असा दावा ह्युंदाई कंपनीने केला आहे. ही ह्युंदाईच्या इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर आधारित आहे. यामध्ये 214 bhp पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क जनरेट करणारी रियर-एक्सल-माउंट इलेक्ट्रिक मोटर आहे. या इ-कारमध्ये 0 kW DC फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. याच्या सहाय्याने कारची बॅटरी फक्त ५७ मिनिटांमध्ये ८० टक्के चार्ज होऊ शकते.