scorecardresearch

Tata-Mahindra वर भारी पडली ‘ही’ कंपनी, एका वर्षात विकल्या ७.२ लाख गाड्या, बनली देशातली नंबर २

Car Sales: या कंपनीच्या कार्सची झाली जबरदस्त विक्री…

Hyundai Creta
'या' कार्सची झाली जबरदस्त विक्री (Photo-financialexpress)

Hyundai Car Sales: आघाडीची वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई मोटर्सने कार विक्रीच्या बाबतीत पुन्हा एकदा महिंद्रा आणि टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांना मागे टाकले आहे. ह्युंदाई ही मार्चमध्ये दुसऱ्या क्रमांकाची कार उत्पादक कंपनी ठरली आहे. ह्युंदाई मोटर इंडियाची मार्चमध्ये घाऊक विक्री एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढून ६१,५०० युनिट्सवर गेली आहे. कंपनीची Hyundai Creta ही बर्‍याच काळापासून Hyundai ची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. तर त्याच्या व्हेन्यू एसयूव्हीलाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.

मार्च २०२३ साठी घाऊक विक्रीचे आकडे शनिवारी जाहीर करताना, कंपनीने सांगितले की, एका वर्षापूर्वी याच कालावधीत त्यांनी ५५,२८७ वाहनांची विक्री केली होती. गेल्या महिन्यात, Hyundai ने देशांतर्गत बाजारात ५०,६०० वाहनांची विक्री केली, जी मार्च २०२२ मधील ४४,६०० वाहनांपेक्षा १३ टक्क्यांनी जास्त आहे. मार्चमध्ये १०,९०० मोटारींची निर्यात झाली होती, जी गेल्या वर्षी याच काळात १०,६७८ मोटारींची होती. दुसरीकडे, जर आपण टाटा मोटर्सबद्दल बोललो तर मार्चमध्ये देशांतर्गत बाजारात तिची घाऊक विक्री ३ टक्क्यांनी वाढून ८९,३५१ युनिट्स झाली. तर मार्च २०२२ मध्ये ८६,७१८ युनिट्सची विक्री झाली. मारुती सुझुकी आणि ह्युंदाई नंतर पीव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स ही तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

(हे ही वाचा : Best Speed for Car Mileage: Petrol Cars कोणत्या स्पीडने बेस्ट मायलेज देतात? जाणून घ्या )

यासोबतच Hyundai ने सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात तिची एकूण विक्री ७,२०,५६५ युनिट्स होती, जी २०२१-२२ मधील ६,१०,७६० युनिट्सपेक्षा १८ टक्के जास्त आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतात काम सुरू केल्यानंतर एका आर्थिक वर्षातील हा सर्वाधिक विक्रीचा आकडा आहे.

ह्युंदाई मोटर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) तरुण गर्ग यांनी निवेदनात म्हटले आहे की, “२०२२-२३ हे आर्थिक वर्ष ह्युंदाई मोटर इंडियासाठी अभूतपूर्व ठरले आहे.” जागतिक आव्हानांना न जुमानता भारतीय वाहन उद्योगाची गती कायम राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 14:09 IST

संबंधित बातम्या