CNG Twin Cylinder Car Launch: मेट्रो शहरात सीएनजी वाहने ही लोकांची पहिली पसंती ठरत आहेत. ही वाहने किफायतशीर किमती आणि कमी धावण्याच्या खर्चासह उच्च मायलेज देतात त्यामुळे अशा कारची मागणी वाढत चालली आहे. सिलिंडरमुळे सीएनजी वाहनांमध्ये कमी बूट स्पेसची समस्या निर्माण झाली होती. पण आता कार उत्पादक कंपन्यांनी यासाठीही मार्ग काढला आहे. आता या वाहनांमध्ये प्रत्येकी ३० किलोचे दोन सिलिंडर दिले जात आहेत, जे ३०० लिटरपेक्षा जास्त बूट स्पेस देते. या मालिकेत, Hyundai ने आता त्यांची सर्वात जास्त विक्री होणारी CNG कार, ट्विन CNG सिलिंडसह देशातील बाजारात दाखल करुन खळबळ उडविली आहे. दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Hyundai ने Hyundai Grand i10 Nios ट्विन CNG सिलेंडरसह सादर केली आहे. ही नवीन कार तिच्या सेगमेंटमध्ये Tata Altroz कारला जोरदार टक्कर देईल असे म्हटले जात आहे. अलीकडेच टाटाने आपल्या Altroz मध्ये दोन सिलिंडर सादर केले होते, ही कार देखील रेसर प्रकारात चमकदार रंगात आणि डॅशिंग लुकमध्ये येते. आता यातच ह्युंदाईने देखील प्रवेश केला आहे. ह्युंदाईची Grand i10 Nios कार सीएनजीवर २७ km/kg पर्यंत मायलेज देते.तर यामध्ये १५ इंच अलॉय व्हील्स आहेत. या कारमध्ये ६० लिटरची इंधन टाकी आहे. (हे ही वाचा : ना Bajaj Chetak ना TVS iQube, देशातील बाजारपेठेत ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरनं केलं सर्वाचं मार्केट जाम, झाली दणक्यात विक्री ) ही नवीन पिढीची कार आहे, ज्यामध्ये सहा मोनोटोन कलर ऑफर केले जात आहेत. कारमधील तेजस्वी प्रकाशासाठी, प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि मागील बंपरवर Y आकाराचे एलईडी डीआरएल दिले गेले आहेत. ही ५ सीटर फॅमिली कार आहे, ज्यामध्ये चार प्रकार उपलब्ध आहेत, यात शार्क फिन अँटेना आणि ८ इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. या कारमध्ये ११९७ cc हाय पॉवर इंजिन आहे, जे जास्त मायलेजसाठी ४ सिलिंडरसह दिलेले आहे. हाय स्पीडसाठी, कारला ६८ bhp पॉवर आणि ९५.२ Nm पॉवर मिळते. Hyundai Grand i10 Nios मधील ही मजबूत वैशिष्ट्ये खराब रस्त्यांसाठी कारमध्ये फ्रंट व्हील ड्राइव्हचा पर्याय उपलब्ध आहे.कारची लांबी ३८१५ मिमी आहे, जी तिला जबरदस्त लुक देते.या ह्युंदाई कारचा व्हीलबेस २४५० मिमी आहे, ज्यामुळे अरुंद जागेतून चालणे सोपे होते.सुरक्षिततेसाठी, कारमध्ये सहा एअरबॅग आणि मागील पार्किंग सेन्सर आहेत. Hyundai Grand i10 Nios किंमत Tata Altroz CNG ची बूट स्पेस २१० लीटर आहे. या कारमध्ये १.२ लीटर हाय पॉवर इंजिन आहे. टाटाच्या या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले यासारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत. कारमध्ये ७.० इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. कारचे शक्तिशाली इंजिन ७७ bhp पॉवर आणि ९७ Nm पीक टॉर्क जनरेट करते. Grand i10 Nios चे दोन-सिलेंडर बेस मॉडेल ७.७५ लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये सादर करण्यात आले आहे.