दक्षिण अमेरिकेत ह्युंदई Accent या नावाने विकली जाणारी Verna लॅटिन एनसीपीए सुरक्षा क्रॅश टेस्टमध्ये अपयशी ठरली आहे. सुरक्षेच्या बाबतीत गाडीला शून्य स्टार रेटिंग मिळालं आहे. ह्युंदई Verna च्या बेस वर्जनची चाचणी घेण्यात आली होती. यात ड्रायव्हर साइड एअरबॅग आणि एबीएससारखे सुरक्षा फिचर्स आहेत. गाडीच्या अनेक चाचण्या झाल्या. मध्यम आकाराची सेडान गाडीला प्रौढ रहिवासी संरक्षणात ९.२३ टक्के, लहान मुलांच्या संरक्षणात १२.६८ टक्के, पादचारी आणि खराब रस्ता संरक्षणात ५३.११ टक्के आणि सुरक्षा सहाय्याासठी ६.९८ गुण मिळवले आहे. तसेच बॉडीशेल आणि फूटवेल एरिया स्थिर असल्याचं सांगितलं आहे.

समोरच्या बाजूने धडक दिल्यानंतर ड्रायव्हर आणि प्रवाशाचे डोकं आणि मानेला तितकी इजा झाली नाही. तर ड्रायव्हरच्या छातीकडे पुरसे संरक्षण असताना सह-प्रवाशाच्या छातीला इजा झाल्याचं दिसून आलं. बाजूच्या धडकेत किरकोळ डोकं आणि छातीला संरक्षण मिळालं. सेडान कार चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन टेस्टमध्येही छाप पाडण्यात अपयशी ठरली. कारण गाडीत चाइल्ड रिस्ट्रेंट सिस्टम नाही. समोरच्या प्रवाशासाठी एअरबॅगचा अभाव क्रॅश चाचणीत दिसून आला. भारतात उपलब्ध Vernaला ड्युअल एअरबॅग्ज मिळतात. तसेच लॅटिन NCAP द्वारे चाचणी केलेली कार Hyundai च्या मेक्सिको प्लांटमध्ये तयार करण्यात आल्याची शक्यता आहे. ही कार कंपनीच्या चेन्नई येथील प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या कारपेक्षा वेगळी आहे.

ह्युंदईची सेडान ३ इंजिन पर्यायांसह येते. १.५ लीटर, ४ सिलेंडर नॅच्युअरली-एस्पिरेटेड पेट्रोल, १.०-लीटर ३-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि १.५-लीटर ४-सिलेंडर टर्बो-डिझेल, ६-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले एनए पेट्रोल इंजिन ११३ बीपीएच पॉवर आणि १४५ एनएम टॉर्क जनरेट करते. १.० L टर्बो पेट्रोल युनिट ११८ बीपीएच पॉवर आणि १७२ एनएम टॉर्क जनरेट करते. हे ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. डिझेल इंजिन ११३ बीपीएचची कमाल पॉवर आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक युनिट समाविष्ट आहे.

ह्युंदई Verna ९.२८ लाख ते १५.२ लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. त्याच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत ९.२८ लाख ते १४.२३ लाख रुपये आहे. दुसरीकडे, डिझेल मॉडेलची किंमत १०.८८ लाख ते १५.३२ लाख रुपये आहे. मॉडेल लाइनअपमध्ये पाच ऑटोमॅटिक व्हेरियंट आहेत.- SX iVT पेट्रोल, SX डिझेल, SX iVT(O) पेट्रोल, SX(O) टर्बो पेट्रोल आणि SX(O) डिझेल असून अनुक्रमे रु. १२.२८ लाख, रु. १३.४२ लाख, रु. १४.१८ लाख. , रु. १४.२३ लाख आणि रु. १५.२३ लाख इतकी किंमत आहे.