पावसाळ्यात बाईक चालवत असाल तर, अपघात टाळण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

पावसाळ्यात दुचाकी आणि स्कूटर चालवणाऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो.

पावसाळ्यात बाईक चालवत असाल तर, अपघात टाळण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो
(फोटो: Financial Express )

Bike Riding Tips For Rain: देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अशा स्थितीत वाहन चालवणे खूप कठीण होऊन बसते. मुसळधार पावसाचा सामना करण्याबरोबरच वाहनचालकांना जोरदार वाऱ्याचाही सामना करावा लागतो. पण अशा हवामानात गाडी चालवताना खबरदारी घेतली पाहिजे. पावसाळ्यात रस्ते अपघातात वाढ होते याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी. जर तुम्ही पावसात तुमची बाईक चालवत असाल, तर ओले रस्ते तसेच कमी दृश्यमानतेला सामोरे जाण्यासाठी तयार राहणे खूप मदत करेल.

पावसाळ्यात दुचाकी आणि स्कूटर चालवणाऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. रस्ते निसरडे झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कधी कधी छोट्या चुकांमुळेही मोठा अपघात होतो. पावसाळ्यात रस्त्यावरील तुमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देत आहोत.

(हे ही वाचा: जग्वार लँड रोव्हरने केली वार्षिक मान्सून सर्व्हिस कॅम्पची घोषणा; जाणून घ्या अधिक तपशील)

वेग कमी ठेवा

पावसाळ्यात वेगाने गाडी चालवू नका. कारण पावसात रस्त्यावरील ट्रॅक्शन कमी होते, त्यामुळे तुमचे वाहनावरील नियंत्रणही कमी होते. मग ती मोटरसायकल असो वा स्कूटर. इतकेच नाही तर गाडी चालवताना अचानक ब्रेक लावल्याने ब्रेकही प्रभावीपणे लागू होत नाहीत. मुसळधार पावसात दृश्यमानताही कमी असते. त्यामुळे पावसाळ्यात तुमच्या दुचाकीचा वेग ताशी ४० किलोमीटरपेक्षा कमी ठेवा.

रस्त्यावर पाणी भरले असेल तर थांबा

पावसाळ्यात ठिकठिकाणी रस्ते जलमय होतात. त्यामुळे अनेकवेळा रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले दिसत नाहीत. हा त्रास रात्रीच्या वेळी जास्त होतो. त्यामुळे जिथे पाणी भरले आहे तिथे अजिबात गाडी चालवू नका. इतकेच नाही तर जास्त पाणी सोडल्याने एक्झॉस्टमध्ये पाणी जाण्याचा धोका आहे, ज्यामुळे वाहन थांबू शकते.

(हे ही वाचा: ‘या’ वाहनांना पुढे जाण्यास मार्ग न दिल्यास कापले जाईल १०,००० रुपयांचे चलान)

फिंगर वाइपर

आजकाल फिंगर वाइपर बाजारात येत आहेत जे हेल्मेटच्या व्हिझरवरील पाण्याचे थेंब स्वच्छ करण्यास मदत करतात. फिंगर वाइपर फार महाग नाहीत. सहसा त्यांची किंमत १०० रुपयांपासून सुरू होते. पावसात हेल्मेटच्या व्हिझरवर (काचेवर) थेंब पडल्याने ते दिसणे अवघड होते. बाकी काही दिसत नाही त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.

हेल्मेट घालणे आवश्यक

तुम्ही कुठेतरी जवळ जात असलात तरीही हेल्मेटशिवाय बाईक किंवा स्कूटर कधीही चालवू नका. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात हेल्मेट घाला. पावसात हेल्मेटच्या व्हिझरमुळे पावसाचे थेंब डोळ्यांवर पडत नाहीत, त्यामुळे दुचाकी चालवणे सोपे जाते. तसेच हेल्मेट तुम्हाला सुरक्षित ठेवते. हेल्मेट न घातल्याने दंड तर भरतोच पण तो तुमच्या जीवाशीही खेळत असतो.

(हे ही वाचा: सर्वात स्वस्त ७ सीटर कार! लूक एकदम नवीन, पेट्रोलसोबत CNG चाही पर्याय उपलब्ध)

सुरक्षित अंतर ठेवा

पावसाळ्यात समोरच्या वाहनापासून नेहमी योग्य अंतर ठेवा. विशेषत: जी वाहने ओव्हरलोडने धावत आहेत. पावसात रस्त्यावर ट्रॅक्शन कमी होते त्यामुळे योग्य वेळी ब्रेक लागत नाहीत. याशिवाय वाहनाचा हेडलाईट नेहमी चालू ठेवा.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Petrol Diesel Price Today: १९ जूनला पेट्रोल आणि डिझेलचा महाराष्ट्रातील दर किती?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी