जर तुम्ही मोटार वाहन चालवत असाल तर तुम्हाला रहदारीशी संबंधित महत्त्वाच्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. पण जर याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही लवकरात लवकर माहिती जाणून घ्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. यासोबतच काही प्रकरणांमध्ये तुरुंगवासही होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला दंड भरावा लागू नये असे वाटत असेल तर तुम्ही वाहतुकीचे सर्व नियम पाळले पाहिजेत.

असे केल्याने, आपण दंडापासून वाचू शकता आणि यामुळे रस्त्यावर सुरक्षित रहदारीचे वातावरणही तयार होईल, जे आवश्यक देखील आहे. परंतु, असे काही वाहतूकीचे नियम आहेत ज्याबद्दल लोकांना सामान्यतः माहिती नसते आणि ते नकळत त्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. पण, त्यासाठीही त्याना दंड भरावा लागू शकतो.

virar, violation of safety norms, global city, sewage treatment plants
विरार : खासगी सांडपाणी प्रकल्पांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!
tuberculosis tb patients marathi news, pm narendra modi tb medicines marathi news
औषधांच्या तुटवड्यासंदर्भात क्षयरुग्णांचे पंतप्रधानांना पत्र

असाच एक वाहतूक नियम म्हणजे, तुम्ही स्लीपर किंवा ‘चप्पल’ घालून दुचाकी चालवू शकत नाही, त्याला परवानगी नाही. सध्याच्या मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी चालवताना पूर्णपणे बंद शूज घालणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायद्याचे उल्लंघन मानले जाईल आणि पकडल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

यासोबतच दुचाकी किंवा स्कूटर चालवताना पॅन्टसोबत शर्ट किंवा टी-शर्ट घालणे आवश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दोन हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. याशिवाय, सामान्य नियमांबद्दल बोलायचे झाल्यास, प्रत्येकाने दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे आवश्यक आहे आणि बाईकशी संबंधित सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत. हे नसल्यासही दंड आकारला जाऊ शकतो.