If you wear Slippers while riding a bike, you will have to pay a fine; Do you know 'these' rules of traffic? | Loksatta

Traffic Rules : बाईक चालवताना स्लीपर घातल्यास भरावा लागेल दंड; वाहतुकीचे ‘हे’ नियम तुम्हाला माहित आहेत का?

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास हजारो रुपयांचा दंड होऊ शकतो. यासोबतच काही प्रकरणांमध्ये तुरुंगवासही होऊ शकतो.

Traffic Rules : बाईक चालवताना स्लीपर घातल्यास भरावा लागेल दंड; वाहतुकीचे ‘हे’ नियम तुम्हाला माहित आहेत का?
तुम्हालाही दंड भरावा लागू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वाहतुकीचे सर्व नियम पाळले पाहिजेत. (Indian Express)

जर तुम्ही मोटार वाहन चालवत असाल तर तुम्हाला रहदारीशी संबंधित महत्त्वाच्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. पण जर याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही लवकरात लवकर माहिती जाणून घ्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. यासोबतच काही प्रकरणांमध्ये तुरुंगवासही होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला दंड भरावा लागू नये असे वाटत असेल तर तुम्ही वाहतुकीचे सर्व नियम पाळले पाहिजेत.

असे केल्याने, आपण दंडापासून वाचू शकता आणि यामुळे रस्त्यावर सुरक्षित रहदारीचे वातावरणही तयार होईल, जे आवश्यक देखील आहे. परंतु, असे काही वाहतूकीचे नियम आहेत ज्याबद्दल लोकांना सामान्यतः माहिती नसते आणि ते नकळत त्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. पण, त्यासाठीही त्याना दंड भरावा लागू शकतो.

असाच एक वाहतूक नियम म्हणजे, तुम्ही स्लीपर किंवा ‘चप्पल’ घालून दुचाकी चालवू शकत नाही, त्याला परवानगी नाही. सध्याच्या मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी चालवताना पूर्णपणे बंद शूज घालणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायद्याचे उल्लंघन मानले जाईल आणि पकडल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

यासोबतच दुचाकी किंवा स्कूटर चालवताना पॅन्टसोबत शर्ट किंवा टी-शर्ट घालणे आवश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दोन हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. याशिवाय, सामान्य नियमांबद्दल बोलायचे झाल्यास, प्रत्येकाने दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे आवश्यक आहे आणि बाईकशी संबंधित सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत. हे नसल्यासही दंड आकारला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Optibike R22 Everest: एका चार्जिंग मध्ये 483km धावणार, ऑप्टी बाईक आर 22 एव्हरेस्ट चे भन्नाट फीचर व किमंत जाणून घ्या

संबंधित बातम्या

वाहन खरेदी करताय? मग आताच करा, पुढल्या वर्षीपासून ‘या’ कंपनीच्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत होणार वाढ
फोनपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 83kmpl मायलेजवाली ही बाईक; वाचा काय आहे ऑफर
५ स्टार सुरक्षा रेटिंग असूनही ‘या’ कारकडे ग्राहकांची पाठ, शेवटी बंद करण्याचा मारुतीचा निर्णय
Car Discounts Offers: संधी गमावू नका! होंडाच्या ‘ह्या’ कारवर मिळत आहे बंपर डिस्काउंट; होणार ‘इतकी’ बचत
फोक्सवॅगनची नवी Virtus गाडी सादर, ‘या’ गाड्यांशी असेल स्पर्धा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘संस्काराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शन’! पाकिस्तानच्या रावलपिंडी मैदानात जो रूटने असं काही केलं…; Video होतोय तुफान Viral
VIDEO: चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अजब शक्कल; चक्क! ‘जॅक लीचच्या…’
“संजय राऊतांना पिसाळलेल्या कुत्रा चावला आहे,” शिंदे गटातील आमदाराची सडकून टीका
शिंदे गटाच्या आमदाराकडून शिवीगाळ, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि…”
“तुमच्यापेक्षा दाक्षिणात्य स्टार्स….” चाहत्याला ढकलल्यामुळे हृतिकवर चाहते संतापले; व्हिडीओ व्हायरल