Tips And Tricks To Improve Bike Mileage : टू व्हीलर सेक्टरच्या बाईक सेगमेंटमध्ये कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणार्‍या बाईक्सची मोठी रेंज आहे आणि या बाईक्सची मागणीही बाजारात खूप आहे. पण अनेकदा जास्त मायलेज असलेली बाईक विकत घेतल्यानंतरही लोक बाईकच्या मायलेजबद्दल चिंतेत राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर तुम्हालाही तुमच्या बाईकच्या मायलेजबद्दल काळजी वाटत असेल, तर येथे जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी, ज्याचे पालन केल्यावर तुमच्या बाईकचे मायलेज हमखास वाढेल.

बाईक सर्व्हिस: अनेकदा असे दिसून येते की लोक बाईकच्या सर्व्हिसमध्ये खूप अंतर ठेवतात, ज्यामुळे बाईकचे एअर फिल्टर खूप घाण होते आणि इंजिन ऑइल देखील संपते. या दोन कारणांमुळे केवळ मायलेज कमी होत नाही तर इंजिन सॅगिंग होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे खर्चात न पडता नियमित अंतराने तुमच्या बाईकची सर्व्हिसिंग करा.

आणखी वाचा : केवळ १५ हजारात मिळतेय Hero HF 100 बाईक, वाचा ऑफर

इंजिन ऑईल: बाईकच्या मायलेजसाठी इंजिन ऑईलचीही मोठी भूमिका असते. त्यामुळे स्वस्ताच्या फंदात न पडता तुमच्या बाईकमध्ये चांगल्या कंपनीचे इंजिन ऑईल घ्या, जेणेकरून बाईकचे इंजिन व्यवस्थित काम करू शकेल.

क्लच आणि गिअरचा योग्य वापर: अनेकदा लोक बाईक चालवताना गिअर आणि क्लचचा योग्य वापर करत नाहीत, त्यामुळे बाईकच्या मायलेजवर परिणाम होतो. त्यामुळे गतीनुसार गीअर वापरा आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा क्लच वापरावा लागणार नाही. योग्य गतीने योग्य गीअर वापरल्यास बाईकचे मायलेज सुधारेल.

आणखी वाचा : केवळ १० हजार डाउन पेमेंट करून खरेदी करा Honda SP 125 Disc व्हेरिएंट, जाणून घ्या EMI

बाईकचा स्पीड: मायलेज असलेली बाईक घेतल्यानंतरही अनेकदा लोक रस्त्यांवर चकरा मारताना दिसतात, तर कंपनीच्या म्हणण्यानुसार, बाईकचे मायलेज फक्त इकॉनॉमी मोडमध्ये म्हणजेच ४० ते ४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने चालवतानाच मिळते. त्यामुळे बाईक नेहमी ४० ते ४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने चालवण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने बाईकचे मायलेज सुधारेल.

रेड लाइटवर इंजिन बंद: बहुतेक लोक रेड लाईटवर थांबताना बाईकचे इंजिन बंद करत नाहीत, त्यामुळे बाईकचे आईल अनावश्यकपणे खर्च होते. त्यामुळे रेड लाईटवर थांबताना तुम्ही तुमच्या बाईकचे इंजिन बंद केलेच पाहिजे. कारण जेव्हा तुमच्या बाईकचे आईल शिल्लक असेल तेव्हा त्यापेक्षा जास्त मायलेज मिळेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important tips to increase bike mileage bike will give more mileage in less cost prp
First published on: 31-08-2022 at 18:04 IST