पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता देशात इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्यांची मागणी वाढली आहे. असं असलं तरी आजही लोकांकडे पेट्रोल डिझेलच्या गाड्या आहेत. मात्र जुन्या झालेल्या गाड्या मायलेज देत नसल्याने अनेक जण हवालदिल झाले आहेत. त्यामुळे गाडी वारंवार गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी द्यावी लागते. गाडीच्या मायलेजसाठी साध्या पाच गोष्टी पाळल्या तरी आपल्या गाडीची कार्यक्षमता वाढेल. जाणून घेऊयात

  • कार सर्व्हिसिंग: गाडी व्यवस्थित राहण्यासाठी योग्यवेळी सर्व्हिस करणं गरजेचं आहे. सर्व्हिस केलेली गाडी, सर्व्हिस न केलेल्या गाडीच्या तुलनेत ४० टक्के कमी इंधन वापरते असं सांगितलं जातं. जेव्हा इंजिन ऑइल कमी होते किंवा फिल्टर अडकलेले असतात तेव्हा इंधनाचा वापर वाढतो. टायरमध्ये हवा कमी असल्याचा परिणामही मायलेजवर होतो. कार सर्व्हिसिंग दरम्यान या बाबींची तपासणी केली जाते. त्याचा मायलेजवर सकारात्मक परिणाम दिसतो.
  • कार बंद करा: एका अहवालानुसार, तुमची कार नुसतीच असेल म्हणजे चालत नसेल तरी ती प्रति तास ३ लीटर इंधन वापरते. त्यामुळे ट्रॅफिक सिग्नलवर किंवा इतर ठिकाणी गाडी १० सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास गाडी बंद करावी. अनेक नवीन वाहनांमध्ये हे फिचर दिलं आहे, त्यामुळे गाडी थांबली की इंजिन बंद होतं. मात्र अजूनही जुन्या गाड्यांमध्ये हे फिचर नाही. त्यामुळे ही कृती केल्यास मायलेज वाढण्यास मदत होईल.
  • गाडी चालवताना: आकडेवारीनुसार, जास्त वेगाने गाडी चालवल्याने कारचे मायलेज १५ ते ३० टक्क्यांनी कमी होते. कार नेहमी योग्य गियरमध्ये आणि सरासरी वेगाने चालवा. जर तुम्हालाही हायस्पीड गाठायचा असेल तर हळूहळू वेग एका लयीत वाढवा. ट्रॅफिकमध्ये किंवा ज्या ठिकाणी वारंवार ब्रेक लावावा लागतो अशा ठिकाणी अतिवेगाने जाण्याचा उपयोग नाही.

Honda Activa 125 vs TVS Jupiter 125: किंमत, स्टाईल आणि मायलेजमध्ये कोण वरचढ?, जाणून घ्या

24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Ten people were poisoned by eating shingada shev
नागपुरात शिंगाड्याचे शेव खाताच मळमळ, उलट्या, पोटदुखी! झाले असे की…
Textile Mill Workers, Transit Camps, Hazardous Building, Issue Persists, shivadi, byculla, lalbaug, parel,
संक्रमण शिबिरांना कंटाळलेल्या गिरणी कामगारांची सुटका कधी ? चाळी मोडकळीस, पुनर्विकास रखडलेला
  • किती इंधन भरायचं?: गाडीत इंधन भरण्याबरोबरच किमान किती तेल भरले पाहिजे हेही कळले पाहिजे. कारमध्ये नेहमी एक चतुर्थांश किंवा त्यापेक्षा अधिक तेल ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तेल १/४ पेक्षा कमी असेल तर इंजिनवर जोर येतो., ज्यामुळे मायलेज कमी होईल.
  • गाडीत जास्त वजन नको: कारमध्ये जास्त सामान भरणे टाळा. कधी-कधी लांबच्या प्रवासाला जाताना गाडी ओव्हरलोड करायची असते. त्यामुळे तुमच्या कारचा मायलेज कमी होते. जड मालाचा थेट परिणाम इंजिनवर होतो. अनावश्यक वजनाच्या वस्तूही गाडीतून काढून टाकल्या पाहिजेत.