scorecardresearch

Auto Expo 2023: यंदाच्या ऑटो एक्स्पोत काय खास असणार? जाणून घ्या तिकिटासह सर्व माहिती

Auto Expo २०२३ मध्ये सर्व वाहन उत्पादन कंपन्यांचे फोकस हे इलेक्ट्रिक गाड्यांवर राहणार आहे.

Auto Expo 2023: यंदाच्या ऑटो एक्स्पोत काय खास असणार? जाणून घ्या तिकिटासह सर्व माहिती
Auto Expo 2023/ Image courtesy – Financial Express

Auto Expo 2023 दोन वर्षांच्या गॅपनंतर उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात येत आहे. ११ जानेवारीपासून १८ जानेवारपर्यंत हा Auto Expo २०२३ होणार आहे. यंदा यामध्ये सर्व वाहन उत्पादन कंपन्यांचे फोकस हे इलेक्ट्रिक गाड्यांवर राहणार आहे. या ऑटो एक्स्पो २०२३मध्ये डिझेल गाड्यांसोबतच इलेक्ट्रिक गाड्या पाहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये कार आणि बाईक , स्कुटर यांचा समावेश असणार आहे. जर तुम्ही ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये जाऊन इच्छित असाल तर त्याचे तिकीट , वेळ आणि आदी बाबी जाणून घेतल्या पाहिजेत.

१३ जानेवारीला ऑटो एक्सपो सुरु होणार असून या पहिल्या दिवशी फक्त बिझनेस क्लास आणि मीडियाचा प्रवेश होणार आहे. १४ जानेवारीपासून ऑटो एक्स्पोमध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश सुरु होणार आहे. यात प्रत्येक दिवशीची वेळ ही वेगवगेळी ठेवण्यात आली आहे. १४ आणि १५ जानेवारीला याची सुरु होण्याची वेळ ११ आणि बंद होण्याची वेळ रात्री ८ ही असणार आहे. १६ आणि १७ जानेवारी रोजी अनुक्रमे ही वेळ सकाळी ११ ते रात्री ७ अशी असेल. तर, १८ जानेवारी रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ अशी वेळ असणार आहे. जर तुम्हाला १४ ते १८ जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी ऑटो एक्सपोला भेट द्यायची असेल, तर तुम्हाला प्रवेश बंद होण्याच्या वेळेच्या १ तास अगोदर आणि कंपन्यांच्या पॅव्हेलियनमध्ये हा ३० मिनिटांपूर्वी प्रवेश बंद करण्यात येईल.

हेही वाचा : Auto Expo 2023 : टाटा मोटर्स करू शकते ‘या’ तीन इलेक्ट्रिक कार्सचे लाँचिंग

जाणून घ्या तिकीट मिळण्याची जागा व तिकीटाची किंमत

ऑटो एक्स्पोचे तिकीट हे ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.बुक माय शो वर जाउन हे तिकीट खरेदी करतो येईल . १३ जानेवारी रोजी तिकीटाची किंमत ही ७५० रूपये आहे. १६ ते १८ जानेवारी दरम्यान तिकीटाची किंमत ही ३५० रूपये आहे. ऑटो एक्सपोमध्ये वीकेंडच्या दिवशी गेल्यास तिकीटाची किंमत ही ४७५ रुपये असेल. ऑटो एक्सपोला जाण्यासाठी सर्वात जवळचे मेट्रो स्टेटशन्स हे नॉलेज पार्क (Knowledge Park ) और जेपी ग्रीन्स (Jaypee Greens) आहेत.इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात जवळचे असून त्याचे अंतर ५३ किलोमीटर इतके आहे.

हेही वाचा : Auto Expo 2023: शाहरुख खानने लाँच केली Hyundai ची ‘ही’ कार, एकदा चार्ज केली की…; पाहा आकर्षक फिचर्स

ऑटो एक्सपोमध्ये जाताना तुम्ही कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच पाळीव प्राणी आत नेऊ शकत नाही. निवांतपणे फिरायचे असल्यास कमीत कमी सामान आपल्यासोबत न्यावे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 13:09 IST

संबंधित बातम्या