भारतीय बाजारात नव्या गाड्या येत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नव्या गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी खूशखबर आहे. मार्च २०२२ मध्ये किया कॅरेन्स एमपीव्ही, टोयोटा हिलक्स पिकअप ट्रक येत आहेत. या गाड्यांची काही ग्राहक आतुरतेने वाट पाहात होते. या गाड्यांबाबत जाणून घेऊयात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किया कॅरेन्स एमपीव्ही
कॅरेन्ससाठी कंपनीने १४ जानेवारीपासून नोंदणी सुरुवात केली आहे. २५ हजार रुपयांची आगाऊ रक्कम देऊन नोंदणी केली जात आहे. नोंदणी सुरु केल्यानंतर २४ तासातच ७,७३८ गाड्यांची नोंदणी झाली होती. ६ आणि ७ सीटर असलेल्या एमपीव्हीची किंमत १६ ते १८ लाखांच्या घरात आहे. या गाडीतील फिचर्स ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहेत. किया कॅरेन्समध्ये तीन इंजिन पर्यायांपैकी सर्वात मजबूत १.४-लिटर चार-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. जे १४० अश्वशक्ती तयार करते आणि ६-स्पीड मॅन्युअलसह ७-स्पीड डीसीटी गियरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याचा डीसीटी प्रकार पॅडल शिफ्टर्ससह येतो. तुलनेत, हे वैशिष्ट्य केवळ महिंद्र मराझोच्या डिझेल प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, तर एर्टिगा आणि एक्सएल ६ चे पेट्रोल प्रकार पॅडल शिफ्टर्ससह येतात.

टोयोटा हिलक्स
टोयोटा किर्लोस्कर मोटारने प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतात हिलक्स लाइफस्टाइल पिकअप ट्रक आणत आहे. या मजबूत पिकअपची विक्री मार्च २०२२ मध्ये सुरू होईल. टोयोटा हिलक्स फक्त डबल-कॅब प्रकारात आहे. गाडीचे भाग टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनरकडून घेतले आहेत. हिलक्स हे एआयएमव्ही-२ प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. टोयोटा फॉर्च्युनरसारखी दिसते. टोयोटा हिलक्स फॉर्च्युनरच्या २.८ लिटर चार-सिलेंडर डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे . जी २०१ बीपीएच पॉवर आणि ४२० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. एसयूव्हीचे ऑटोमॅटिक व्हेरियंट ५०० एनएम पीक टॉर्क निर्माण करते. हिलक्स फक्त ४ बाय ४ वर्जनमध्ये उपलब्ध आहे. एसयूव्हीमध्ये ड्राइव्ह असिस्ट फिचर्स आहेत. यात हिल असिस्ट, ब्रेक असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिट प्रोग्राम, लिमिटेड-स्लिप डिफरेंशियल आणि डिफरेंशियल लॉक यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हिलक्स ७०० मिमी खोल पाण्यात चालवता येते.

रस्ते अपघातात व्होल्वोचा ‘थ्री पॉइंट सीट बेल्ट’ ठरतोय जीवरक्षक; लोकांच्या जीवासाठी सोडलं नफ्यावर पाणी

एमजी झेडएस इव्ही
भारतीय बाजारपेठेतील काही इलेक्ट्रिक कारपैकी एक एमजी झेडएस इव्ही आहे. चीनी मालकीची ब्रिटीश कार कंपनी एमजी लवकरच या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे मॉडेल देशात लॉन्च करणार आहे. सध्याच्या मॉडेलपेक्षा लांब रेंजमध्ये भारतात येईल अशी अपेक्षा आहे. कंपनी त्याच्या बाह्य आणि अंतर्गत डिझाइनमध्ये बदल करणार आहे. हे एमजी झेडएस इव्हीचे फेसलिफ्ट मॉडेल असून मोठ्या आकाराच्या आणि शक्तिशाली बॅटरीसह येईल. एमजी झेडएस इव्हीला एलईडी डीआरएलएससह पुन्हा डिझाइन केलेले एलईडी हेडलॅम्प आणि फ्रंट बंपर असतील. नवीन झेडएस इव्हीला १०.१ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, लेव्हल २ एडीएएस आणि एआय असिस्टंट आहे. मॉडेल ५१ किलोवॅट बॅटरी पॅकसह ४८० किमी पर्यंत मायलेज देते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In india march 2022 three suv launching know the features rmt
First published on: 24-01-2022 at 17:12 IST