In the month of December, the Renault India car company is offering a discount of up to Rs 50,000 on all its cars | Loksatta

Car Discount Offers: ‘या’ कंपनीच्या कार खरेदीवर मिळतोय ५० हजारांचा डिस्काउंट; कार पाहून लगेच खरेदी कराल

December Discounts Offers: डिसेंबर महिन्यात जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे, कारण या कंपनीची तुमच्या आवडीची कार घेण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.

Car Discount Offers: ‘या’ कंपनीच्या कार खरेदीवर मिळतोय ५० हजारांचा डिस्काउंट; कार पाहून लगेच खरेदी कराल
डिसेंबर महिन्यात Renault India कारच्या सर्व कारवर ५० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट. (Photo-indianexpress)

December Discounts Offers: जर तुम्ही नवीन कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण या डिसेंबर महिन्यात एक कार कंपनीने तिच्या कारवर भरघोस सूट देण्याची घोषणा केली आहे. ज्या माध्यमातून तुमची बचत होणार आहे. कोणत्या कार कंपनीने ही विशेष ऑफर आणली आहे जाणून घेऊया.

Renault India कार विशेष ऑफर
भारतीय बाजारात ऑटोमोबाइल कंपनी रेनॉची मजबूत पकड आहे. ग्रामीण भागांपासून ते शहरी भागांपर्यंत रेनॉच्या गाड्यांचा जबरदस्त विक्री होत आहे. ज्यामुळे आता कंपनीने भारतीय बाजारात एक जबरदस्त ऑफर आणली आहे. रेनॉने या डिसेंबर महिन्यात आपल्या कारवर ५०,००० रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटची घोषणा केली आहे. यामध्ये रोख सूट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बेनेफिट्स मिळतील. या ऑफर्स ३१ डिसेंबरपर्यंतच उपलब्ध असणार असून या कार घेण्यासाठी तुम्ही रेनॉ इंडियाच्या डीलरशिपवर जाऊ शकता. पाहूयात या ऑफर्समध्ये कोणत्या गाडीवर किती रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. 

(आणखी वाचा : Second Hand Bike: अरे वा! फक्त १५ हजारात घरी आणा ‘ही’ १ लाखाची बाईक; मिळेल जबरदस्त मायलेज आणखी बरंच काही…)

या’ कारवर मिळतेय विशेष ऑफर

Renault Triber

Renault या महिन्यात त्यांच्या Renault Triber कारवर २५,००० रूपयांचा एक्सचेंज बोनस, १०,००० रूपयांची कॉर्पोरेट सूट, १०,००० रूपयांचा स्क्रॅपेज लाभ आणि १५,००० रूपयांची रोख सवलत देत आहे. अशा प्रकारे, या कारच्या खरेदीवर एकूण ६०,००० रूपयांची बचत केली जाऊ शकते.

Renault Kwid

Renault च्या क्विड या कारवर ३५,००० रुपयांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. Renault Kwid 10,000 रूपये कॉर्पोरेट सवलत, 15,000 रूपयांचा एक्सचेंज ऑफर, १०,००० स्क्रॅप बेनिफिट आणि १०,००० रूपये रोख सूट यासह एकूण ४५,००० रुपयांच्या सवलतीच्या ऑफर मिळवत आहेत.

Renault Kiger
रेनॉ क्विडप्रमाणे रेनॉ कायगर या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर ३५,००० रुपयांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. Renault या महिन्यात या कारवर १५,००० रूपये एक्सचेंज बोनस, १०,००० रूपये स्क्रॅपेज लाभ, १०,००० रूपये कॉर्पोरेट सवलत आणि दोन वर्षांची कारवर वॉरंटी सुद्धा देत आहे. अशा प्रकारे, या कारवर एकूण ४५,००० रूपयांची बचत केली जाऊ शकते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 12:44 IST
Next Story
Car Tips: थंडीच्या दिवसांत कारमध्ये हीटर किंवा ब्लोअर वापरत असाल तर ‘या’ चुका करु नका; अन्यथा हलगर्जीपणा पडेल महागात…