दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाईने १० जुलै रोजी भारतीय बाजारात एक्स्टर एसयूव्ही लाँच केली. कमी किंमत, उत्तम मायलेज आणि उत्तम फिचर्सने परिपूर्ण असलेल्या या परवडणाऱ्या एसयूव्हीने बाजारात येताच लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तर आता ह्युंदाईच्या सर्वात परवडणाऱ्या एक्स्टर एसयूव्हीने सुमारे एक लाखापर्यंत बुकिंग मिळवल्या आहेत. ह्युंदाई कंपनीची मायक्रो-एसयूव्ही जुलैमध्ये लाँच करण्यात आली होती. तसेच कार निर्मात्यांनी मे महिन्यात ग्राहकांच्या ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. ह्युंदाई एक्स्टरची किंमत सहा लाख ते १० लाख १०.१५ लाख रुपयांदरम्यान आहे. ह्युंदाई कंपनीच्या एक्स्टरने जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत देशांतर्गत बाजारात ३१,१७४ (31,174) एवढ्या वाहनांची विक्री केली आहे. ह्युंदाईने जुलैमध्ये ७,०००, ऑगस्टमध्ये ७,४३० तर सप्टेंबरमध्ये ८,६४७ आणि ऑक्टोबरमध्ये ८,०९७ युनिट्स वाहनांची विक्री केली.
ह्युंदाई मोटार इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) तरुण गर्ग यांनी सांगितले की, ह्युंदाईच्या एक्स्टरसाठीची बुकिंग आता एक लाखांच्या जवळपास आहे. गर्ग यांच्या म्हणण्यानुसार, हाय-एंड ट्रिम्सचा (high-end trims) एकूण बुकिंगपैकी ३१ टक्के वाटा आहे, तर गाडीच्या सनरूफ या फिचरमुळे कंपनीने ७८ टक्के बुकिंग मिळवले आहे. ह्युंदाईच्या एक्स्टरमध्ये (Hyundai Exter) १.२ लिटर (1.2), चार सिलेंडर (4), कप्पा पेट्रोल इंजिन आहे (Kappa petrol engine) ; जे ८३पीएस (83PS) आणि ११३.८ एनएम (113.8Nm) जनरेट करते.




हेही वाचा…Petrol Diesel Price Today: मुंबईसह प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहा
ह्युंदाई कंपनीच्या एक्स्टरचे फिचर :
ह्युंदाई कंपनीच्या एक्स्टरच्या बाह्य डिझाईनमध्ये पॅरामेट्रिक ग्रिल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, सिग्नेचर एच-एलईडी टेललॅम्प, पुढील आणि मागील स्किड प्लेट्स, १५-इंच डायमंड-कट, अलॉय व्हील आणि शार्क फिन अँटेना आदी अनेक फिचर्स आहेत. एक्स्टर व्हॅनच्या आतमध्ये लेदरेट अपहोल्स्ट्री, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील आणि गियर नॉब, फूटवेल लाइटिंग आणि मेटल पेडल्सवर ब्लॅक थ्रीडी (3D) पॅटर्न फिनिशिंग आहे. यात व्हॉईस-सक्षम इलेक्ट्रिक सनरूफ, ड्युअल कॅमेरासह डॅशकॅम, वायरलेस चार्जर, मागील एसी व्हेंट्स आणि कूल्ड ग्लोव्ह बॉक्स यांसारखी खास वैशिष्ट्ये आहेत. कारमध्ये ८ इंच (8) टचस्क्रीन आणि ४.२ (4.2) इंचाचा मल्टीइन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID) आहे. एक्स्टरमध्ये मागील तीनही प्रवाशांना तीन-पॉइंट सीट बेल्ट मिळतील. अशाप्रकारे ह्युंदाईच्या नवीन कारमध्ये ६० हून अधिक कनेक्टेड कार फिचर्सदेखील उपलब्ध आहेत.