Premium

जपानला मागे टाकत भारत बनला Automobile क्षेत्रातला तिसऱ्या क्रमांकाचा देश; नितीन गडकरी म्हणाले, “२०२८ पर्यंत आपण..”

सध्या ऑटोमोबाईल मार्केटच्या जागतिक यादीमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे. यादीत पहिल्या क्रमांकावर चीन, तर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका हे देश आहेत.

nitin gadkari on indias growth in automobile sector
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भारत सतत प्रगती करत असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच आपल्या देशाने जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल बाजारपेठेच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी करताना भारताने जपानला मागे टाकले आहे. या यादीमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर, तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने केलेल्या या कामगिरीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. PTI च्या माहितीनुसार, “भारत पुढील पाच वर्षांमध्ये जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट बनेल”, असे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील ऑटोमोबाईल उद्योग आणि जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनण्याच्या संधीबाबत बोलताना त्यांनी आकडेवारींची माहिती दिली. ते म्हणाले, “सध्या देशातील ऑटोमोबाईल उद्योगाचा आकार हा ७.५ लाख कोटी रुपये इतका आहे. या क्षेत्रामुळे आतापर्यंत तब्बल ४.५ कोटी रोजगार निर्माण झाले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्या या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना सर्वात जास्त Goods and Services Tax (GST) देत आहेत.”

भविष्यात आपला देश सर्वात मोठे ऑटोमोबाईल मार्केट बनू शकतो असा आत्मविश्वास असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “२०२८ पर्यंत देशातील ऑटोमोबाईल क्षेत्राचा आकार हा तब्बल १५ लाख कोटी रुपये होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे आपण येत्या पाच वर्षांमध्ये ऑटो क्षेत्रामध्ये पहिल्या स्थानावर असू असा मला विश्वास आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगतीमुळे आपला देश महासत्ता बनेल. ऑटो उद्योग भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्ठा बनण्यास मदत करेल.”

Honda Cars India च्या विक्रीदरात तब्बल ४३ टक्क्यांनी घट; मे २०२३ मध्ये झाली फक्त ४,६६० युनिट्सची विक्री, पाहा आकडेवारी

तसेच नितीन गडकरी यांनी पेट्रोल, डिझेल अशा इंधनाच्या ऐवजी पर्यावरण पूरक इंधनांच्या पर्यायांचा वापर करण्यावर भर द्यायला हवे असेही सांगितले. सध्या आपला देश हा जीवाश्म इंधनावर पूर्णपणे अवलंबून आहे. “भारत दरवर्षी सुमारे १६ लाख कोटी रुपये किंमत असलेले जीवाश्म इंधन (पेट्रोल, डिझेल) यांची आयात करतो. Green hydrogen आणि ammonia या पर्यायांचा वापर भविष्यात मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे. भारताला इंधनाची, ऊर्जेची निर्यात करणारा देश बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहेठ” असे विधान नितीन गडकरींनी केले.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India has overtaken japan to become number 3 country in the automobile sector nitin gadkari said by 2028 become worlds largest automobile market know more yps