SaferCarsForIndia मोहिमेचा एक भाग म्हणून, ग्लोबल एनसीएपीने स्वदेशी बनावटीच्या चार मेड इन इंडिया कारची क्रॅश चाचणी केली आहे. ग्लोबल एनसीएपीमध्ये रेनॉल्ट कीगर, निसान मॅग्नाइट, होंडा जॅझ आणि होंडा सिटी सेडानचा यात समावेश होता. ग्लोबल एनसीएपीने अलीकडेच या क्रॅश चाचणीचे निकाल सार्वजनिक केले आहेत आणि त्यात समाविष्ट असलेल्या सर्व कारना प्रौढ व्यक्ती सुरक्षितता रेटिंगमध्ये चार स्टार मिळाले आहेत. जर तुम्ही देखील लवकरच कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की त्यापैकी कोणती कार सर्वात सुरक्षित आहे.

Honda Jazz: होंडा जॅझला ग्लोबल एनसीएपी कार क्रॅश रेटिंगमध्ये प्रौढ व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी चार स्टार मिळाले आहेत. त्याचबरोबर या कारला चाइल्ड ऑक्युपंट सेफ्टीमध्ये ३ स्टार मिळाले आहेत. कार अपघात चाचणीत होंडा जॅझने प्रौढ व्यक्तींच्या सुरक्षिततेमध्ये १७ पैकी १३.८९ गुण मिळवले आहेत. बालकांच्या सुरक्षेमध्ये एकूण ४९ गुणांपैकी ३१.५४ गुण मिळाले आहेत.

How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
he was scratching his groin bengaluru metro official on security guard accused of masturbating viral video
सुरक्षा रक्षकाने भरमेट्रो स्थानकात हस्तमैथुन केल्याचा महिलेचा आरोप; धक्कादायक घटनेचा Video व्हायरल
Dharavi slum tour
धारावीला ‘झोपडपट्टी टूर’ म्हणत नाव ठेवणाऱ्या परदेशी इन्फ्ल्युएन्सरवर संतापले नेटकरी, म्हणाले, “ही मस्करी करतेय का?”

Nissan Magnite: निसान मॅग्नाइट एसयूव्हीने प्रौढ व्यक्तींच्या सुरक्षेसाठी ग्लोबल एनसीएपी कार क्रॅशमध्ये ४ स्टार मिळवले आहेत. या एसयूव्हीला चाइल्ड ऑक्युपंट सेफ्टीमध्ये २ स्टार मिळाले आहेत. निसान मॅग्नाइटच्या कार क्रॅश रेटिंगच्या गुणांबद्दल बोलायचे झाल्यास, या एसयूव्हीला प्रौढांच्या सुरक्षेमध्ये १७ पैकी ११.८५ गुण आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ४९ पैकी २४.८८ गुण मिळाले आहेत.

Kia Carens: कियाची कॅरेन्स गाडी भारतात लाँच, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Renault Kiger: रेनॉल्टच्या सर्वात लोकप्रिय एसयूव्ही किंगरने देखील ग्लोबल एनसीएपी कार क्रॅश रेटिंगमध्ये प्रौढ व्यक्तींमध्ये ४ स्टार मिळवले आहेत. त्याच वेळी, या एसयूव्हीला लहान मुलांच्या सुरक्षेसाठी २ स्टार मिळाले आहेत. ग्लोबल एनसीएपी कार क्रॅश चाचणीत प्रौढ व्यक्तीमध्ये १७ पैकी १२.३४ गुण मिळाले आहेत. त्याच वेळी, या एसयूव्हीला लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ४९ पैकी २१.०५ गुण मिळाले आहेत.

Honda City: होंडा सिटीनेही ग्लोबल एनसीएपी कार क्रॅश चाचणीत भाग घेतला. यात या सेडान कारला प्रौढ व्यक्तीमध्ये ४ स्टार आणि लहान मुलांसाठी ४ स्टार मिळाले आहेत. जर आपण कार क्रॅश रेटिंग स्कोअरबद्दल बोलायचे झाले, तर प्रौढ व्यक्तींच्या सुरक्षिततेमध्ये १७ पैकी १२.०३ गुण आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेमध्ये ४९ पैकी ३८.२७ गुण मिळाले आहेत.