India’s Best-Selling Car in October 2025: भारताच्या वाहन बाजारात सध्या अशी एक कार आहे, जिने दिवाळीच्या तोंडावर अक्षरशः धिंगाणा घातला आहे. उत्सवाच्या खरेदीसोबतच जीएसटी कपातीचा दुहेरी फायदा मिळाल्याने ही कार देशभरात इतक्या झपाट्याने विकली गेली की मारुती, ह्युंदाई, महिंद्रा यांसारख्या दिग्गज कंपन्यांनाही काही क्षणांसाठी काय घडलं हे कळलंच नाही. आश्चर्याची बाब म्हणजे सलग दोन महिने भारताच्या कार विक्रीच्या यादीत हाच एक मॉडेल अव्वल ठरला आहे. पण, ही कार नेमकी कोणती? चला तर सविस्तर जाणून घेऊया..
दिवाळी, धनत्रयोदशी आणि लग्नसराईच्या धामधुमीत जिथे सगळ्या मोठ्या कंपन्या पहिल्या क्रमांकासाठी झुंजत होत्या, तिथे एका कारने शांतपणे पण प्रचंड वेगाने सगळ्यांना मागे टाकत विक्रीत असा विक्रम केला की उद्योगक्षेत्र थक्क झाले. ऑक्टोबर २०२५ च्या महिन्यात तब्बल २२ हजार ८३ कारची विक्री झाली. त्याआधी म्हणजे सप्टेंबर २०२५ मध्येही हा आकडा २२ हजार ५७३ इतका प्रचंड होता. म्हणजेच सलग दोन महिन्यांत ही कार भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली.
देशातील कारप्रेमींच्या मनावर या कारचं वर्चस्व इतकं प्रचंड आहे की, मागील एफवाय२२, एफवाय२३ आणि एफवाय२४ या सलग तीन आर्थिक वर्षांत ही कार भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही राहिली आहे. एफवाय२५ मध्ये जरी कारची संख्या थोडी घटून १ लाख ६३ हजार इतकी झाली, तरी विक्रीतली पकड अजूनही इतकी मजबूत आहे की इतर कोणतीही कार तिच्यापुढे टिकूच शकत नाही.
दरम्यान, एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांतच या कारच्या जवळपास ९० हजार गाड्यांची विक्री झाली होती आणि मग आला ऑक्टोबरचा सणासुदीचा हंगाम, ज्याने या कारची लोकप्रियता एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवली.
पण लोक इतक्या मोठ्या प्रमाणात ही कार का घेत आहेत? त्याचं सर्वात मोठं कारण आहे जीएसटी दरात झालेली मोठी कपात!
नव्या टॅक्स स्ट्रक्चरनुसार या कारच्या किमतीत तब्बल १ लाख ५५ हजार रुपयांपर्यंत घसरण झाली. त्यातच टाटा कंपनीने सप्टेंबरमधील सवलत ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवली आणि ग्राहकांनी अक्षरशः बुकिंगचा पाऊसच पाडला. आता या कारची किंमत फक्त ७ लाख ३२ हजार (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, ज्यामुळे अनेक बजेट श्रेणीतील ग्राहकांसाठी ती ‘परफेक्ट ऑप्शन’ ठरली.
इंजिन व तंत्रज्ञानाच्या बाबतीतही ही कार ‘संपूर्ण पॅकेज’ कार मानली जाते. याची कारणे भरपूर आहेत.
- १.२-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन
- १.५-लिटर डिझेल इंजिन
- पेट्रोल–सीएनजी (ट्विन सिलिंडर तंत्रज्ञानासह)
- आणि याच मॉडेलचा अत्यंत लोकप्रिय इलेक्ट्रिक अवतार, ज्यात ३० kWh व ४५ kWh अशा दोन बॅटरी पर्यायांसह २१०-२३० किमी आणि ३५०-३७५ किमी रेंज मिळते.
सेफ्टीच्या बाबतीतही ही कार जबरदस्त
भारत NCAP मध्ये ५-स्टार रेटिंग, ६ एअरबॅग्स, ईएसपी, एलईडी हेडलॅम्प्स, व्हेंटिलेटेड सीट्स, १०.२५-इंच टचस्क्रीन, डिजिटल क्लस्टर आणि ३६०° कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये ही कार इतरांपेक्षा वेगळी ठरवतात.
त्यामुळेच मारुती ब्रेझा, ह्युंडई वेन्यू, महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओ, किया सॉनेट आणि स्कोडा कायलेक यांसारख्या दिग्गज प्रतिस्पर्ध्यांनाही ही कार सतत मागे टाकत आहे.
आणि शेवटी…हाच तर मोठा खुलासा, सप्टेंबरनंतर ऑक्टोबर २०२५ मध्येही भारतात सर्वाधिक विक्री झालेली कार म्हणजे टाटा नेक्सॉन!
