Cheapest Bikes in India 2024 Price Details & Models : सध्या देशात एंट्री लेव्हल बाइक्सची खूप क्रेझ पाहायला मिळत आहे, कारण कमी किमतीत चांगले पर्याय ऑप्शन असणाऱ्या बाईक्स मिळत आहे.या बाइक्स केवळ चांगले मायलेजच देत नाही तर त्यांचा देखभाल खर्च देखील कमी असतो.जे लोक दररोज बाईकने लांबचा प्रवास करतात त्यांच्यासाठी एंट्री लेव्हल बाइक हा सर्वोत्तम पर्याय आहे.जर तुम्हीही अशाच बाइकच्या शोधात असाल,आम्ही तुमच्यासाठी ७० हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या पाच चांगल्या बाईक मॉडेल्स घेऊन आलो आहोत. ज्या तुम्हाला अधिक मायलेज देतील आणि जास्त उपयोगी ठरतील.
होंडा शाइन १०० (Honda Shine 100)
या बाईकमध्ये ९८.९८ cc इंजिन देण्यात आले असून जे ५.४३ kW ची पावर आणि ८.०५ Nm टॉर्क जनरेट करते.हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये ६५ किलोमीटरपर्यंत मायलेज देईल असा दावा केला जात आहे. या बाईकच्या फ्रंट आणि रियरमध्ये ड्रम ब्रेक्स आहेत. या बाईकची किंमत ६५,००० रुपये आहे. मऊ आणि लांब सीट्समुळे या बाईकने खराब रस्त्यावर सहज प्रवास करता येतो. यात कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम आहे, ज्यामुळे चांगले ब्रेकिंग मिळते पण डिस्क ब्रेकची कमतरता जाणवते.रोजच्या वापरासाठी ही एक उत्तम बाईक आहे.
हिरो एफएफ १०० (Hero HF100)
हिरो मोटोकॉर्पची HF100 ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. कंपनीने लहान शहरांपासून मोठ्या शहरांपर्यंतच्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन या बाइकची रचना केली आहे. या बाइकमध्ये १०० cc इंजिन आहे जे ८.०२ PS पॉवर जनरेट करते.यात ४ स्पीड गिअरबॉक्स इंजिन आहे.जी एका लिटर पेट्रोलमध्ये ७० किलोमीटर मायलेज देते. या बाईकची सीट आरामदायी आहे. बाईकमध्ये बसवलेले सस्पेन्शन एकदम सॉलिड आहे ज्यामुळे खराब रस्त्यावर बाईक चालवताना कोणतीही अडचण येत नाही. या बाईकची किंमत ५६,३१८ रुपये आहे.
मारुतीची कार खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! CNG कार ‘या’ दिवशी होणार लाँच; वाचा किंमत, फीचर्स
टीव्हीएस स्पोर्ट्स (TVS Sport)
टीव्हीएस स्पोर्ट ही एंट्री लेव्हल बाइक सेगमेंटमधील सर्वात स्टायलिश बाइक आहे. या बाइकमध्ये ११० cc चे इंजिन आहे जे ८.२९ PS पॉवर आणि ८.७ Nm टॉर्क जनरेट करते. यात ४ स्पीड गिअरबॉक्स आहे. त्यात बसवलेल्या ET-Fi टेक्नोलॉजीमुळे इंधनाचा वापर कमी होतो. ही बाईक एक लिटर इंधनात ७० किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.
Asia Book of Records आणि India Book of Records नुसार, TVS Sport ने ११०.१२ मायलेज मिळवून मायलेजचा नवा विक्रम रचला आहे.या बाईकमध्ये १० लिटरची इंधन टाकी आहे. बाइकच्या दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक उपलब्ध आहेत. ही बाईक डिझाईनच्या बाबतीत स्पोर्टी आहे. राजस्थानमध्ये TVS Sport ES ची एक्स-शोरूम किंमत ५९,८८१ रुपये आहे.
टीवीएस एक्सएल १०० (TVS XL 100)
भारतात TVS XL 100 किंमत ४४,९९० रुपयांपासून सुरू होते. ही बाईक मोपेडपेक्षा कमी आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात ९९.७ cc फ्यूल इंजेक्शन टेक्नॉलॉजीचे ४ स्ट्रोक आणि सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे ४.३ bhp पॉवर आणि ६.५ Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक एका लिटरमध्ये ८० किलोमीटर मायलेज देते.
तुम्ही ही बाईक दोन प्रकारे वापरू शकता. जर तुम्ही लहान व्यवसाय चालवत असाल आणि भरपूर सामान लोड करावे लागत असेल तर तुमच्यासाठी TVS XL 100 हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्याचे कर्ब वजन ८९ किलो आहे तर पे-लोड १३० किलो आहे. हे हेवी ड्युटी मशीन आहे. त्याचा टॉप स्पीड ताशी ६० किमी आहे.