scorecardresearch

‘या’ विशेष कारमधून नेण्यात आले राणी एलिझाबेथ २ यांचे पार्थिव, जाणून घ्या फीचर्स

एलिझाबेथ यांना मान सन्माने आखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे पार्थिव एका विशेष कारमध्ये नेण्यात आले होते. अंत्ययात्रेसाठी या कारचे निर्माण करण्यात आले होते. या कारबाबत आपण जाणून घेऊया.

‘या’ विशेष कारमधून नेण्यात आले राणी एलिझाबेथ २ यांचे पार्थिव, जाणून घ्या फीचर्स
कार (pic credit – pixabay)

ब्रिटेनच्या राणी एलिजाबेथ द्वितीय यांचे 8 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण ब्रिटेन शोक सागरात बुडाले होते. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर्वाधिक काळ राणीपद भूषवण्याचा मान मिळवला आहे. लंडन येथे त्यांचा जन्म झाला होता. एलिझाबेथ यांना कोरोना झाला होता. त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. त्यानंतर ८ सप्टेंबरला त्यांचे निधन झाल्याचे समजले.

एलिझाबेथ यांना मान सन्मानाने आखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे पार्थिव एका विशेष कारमध्ये नेण्यात आले. अंत्ययात्रेसाठी या कारचे निर्माण करण्यात आले होते. या कारबाबत आणि तिच्या काही खास वैशिष्ट्यांबाबत आपण जाणून घेऊया.

या वाहनात नेण्यात आले

एलिझाबेथ यांच्या शवपेटीला कोचबिल्डर बिंझद्वारे निर्मित मर्सडिज बेन्झ इ क्लास या वाहनातून नेण्यात आले. या कारला पाच प्रवेशद्वार आहेत. एलिझाबेथ यांच्या पार्थिवाला या कारने स्कॉटलँडच्या बाल्मोरल येथून एडिनबर्ग येथे नेण्यात आले होते. अहवालांनुसार, वापरण्यात आलेली मर्सडिज इ क्लास कार बिंझ एच ४ वर आधारित आहे. शवपेटी मर्सडिज मागील ओक कास्केटमध्ये ठेवण्यात आली होती.

car
मर्सडिज बेन्झ इ क्लास (pic credit – Binz international)

या कारबाबत काही विशेष गोष्टी आपण जाणून घेऊया.

  • राणी एलिझाबेथ यांची शवपेटी घेऊन जाणाऱ्या मर्सडिज बेन्झ इ क्लास वाहनाला बिंझ इंटरनॅशनल या कंपनीने बनवले आहे.
  • मर्सडिज बेन्झ इ क्लास हे मॉडेल लांब व्हीलबेस आणि मागील डेकसह येते.
  • या वाहनाची एकूण लांबी ५ हजार ९९९ मिमी इतकी आहे जे एस२१२इ क्लासच्या तुलनेत १ हजार १०४ मिमी अधिक आहे.
  • या वाहनामध्ये पुढे आणि मागे बसण्यासाठी भरपूर जागा आहे.
  • कारमध्ये २ हजार ८०० मिमीचा कास्केट डेक मिळतो.
  • कारची एकूण उंची १ हजार ९२० मिमी इतकी आहे. मागील भागातील खिडकी ७५० मिमी उंच आहे.
  • ही कार मॉडिफाय करणारी बिंझ कंपनी 1950 पासून मर्सडिज बेन्झसोबत काम करत आहे.
  • बिंझ ही कंपनी कोचबिल्डिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि ती रुग्णवाहिका किंवा मृतदेह वाहून नेणारे वाहन बनवण्यासाठी ओळखली जाते.
  • बिंझने एअरमैटिक एअर सस्पेंशन कायम ठेवले आहे. या कंपनीची कार इ३००इ पेट्रोल इलेक्ट्रिक प्लग इन हायब्रिड इंजिन किंवा २.० लीटर टर्बो डिझल इंजनसोबत उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या