मिस्टर बीन म्हटलं की लगेचच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि औत्सुक्याचे भाव उमटतील. एक अत्यंत लोकप्रिय अभिनेता, लेखक आणि निर्माता रोवन एटकिन्सन यांना त्यांच्या खऱ्या नावापेक्षा मिस्टर बीन या टोपण नावानेच ओळखलं जातं. कारण ही त्यांची सर्वाधिक गाजलेली व्यक्तीरेखा आहे. ख्रिसमसची खरेदी संपल्यानंतर कारच्या रुफ टाॅपवर बसून मिस्टर बीनने त्याचा मिनी कूपर चालवला होता, हे दृश्य प्रत्येकाला आठवत असेलच, आता आपल्या भारतातील एका व्यक्तीने आपल्या जुन्या Hyundai Santro हॅचबॅकचा वापर करून हा दृश्य पुन्हा समोर आणला आहे. या पठ्ठ्याने नेमकं केलं तरी काय, चला तर जाणून घेऊया.
Hyundai Santro ला बनवली इलेक्ट्रिक कार
गुरुग्रामचा राहणारा मिहिर वर्धन याने जुन्या पिढीतील Hyundai Santro या पेट्रोल हॅचबॅकचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर केले. अवघ्या ३ दिवसांत कारचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यात त्याला यश मिळाले आहे. सॅन्ट्रो ईव्हीच्या यशानंतर त्याने रिमोट कंट्रोल कार बनवून गोष्टी पुढच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला. रिमोट कंट्रोल कार बनवण्यासाठी मिहिरला कारमध्ये अनेक बदल करावे लागले.
(आणखी वाचा : 7-सीटर SUV-MPV शोधताय? पुढील वर्षांत लाँच होणार ‘या’ पाच दमदार कार, लूक अन् डिझाईनही कमाल )
‘अशी’ केली इलेक्ट्रिक कार तयार
मिहीरला त्याची ह्युंदाई सँट्रो कार इलेक्ट्रिक कार कशी बनवायची याची कल्पना होती पण ती पूर्ण करणे सोपे नव्हते. रिमोट कंट्रोलचा वापर करून कारचे स्टीयरिंग करण्यासाठी त्याने कारमध्ये काही बदल केले. त्याने सुरुवातीला स्टीयरिंगवर एक स्प्रॉकेट बसवले आणि साखळी वापरून लहान इलेक्ट्रिक मोटरने जोडले. इलेक्ट्रिक मोटर फॅब्रिकेटेड मेटल माउंटवर बसवली. या कारवरील थ्रॉटल इनपुट डिजिटल पद्धतीने नियंत्रित केले जाते. या सर्व यंत्रणा कारमधील Arduino Uno मायक्रोकंट्रोलरशी जोडलेल्या आहेत. ही निश्चितच एक अतिशय अनोखी निर्मिती आहे आणि मिहीरने या निर्मितीसाठी घेतलेल्या प्रयत्नांचे अनेकांनी कौतुकही केले आहे.
(आणखी वाचा : दोन मारुती कारवर केलं भन्नाट प्रयोग! चक्क ५ हजार लीटर पाणी केलं गरम, पाहा हा व्हिडीओ)
मिस्टर बीनकडून घेतली प्रेरणा
त्याने मिस्टर बीनकडून प्रेरणा घेतली आणि दृश्य पुन्हा तयार केले असे म्हटले जात आहे. या प्रयोगासाठी वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रिक सॅन्ट्रोमध्ये सध्या अतिशय लहान बॅटरी आणि कमी शक्तीची इलेक्ट्रिक मोटर वापरली. त्याचा सध्याचा वेग ६० किमी प्रतितास आहे आणि ड्रायव्हिंग श्रेणी ८०-९० किमी आहे.
