Jaguar Land Rover will get statesponsored loan of 670 million US Dollar | जग्वार लँड रोव्हर कंपनीला ६७० मिलियन अमेरिकन डॉलर्सचं कर्ज देण्याचा निर्णय; कारण... | Loksatta

जग्वार लँड रोव्हर कंपनीला ६७० मिलियन अमेरिकन डॉलर्सचं कर्ज देण्याचा निर्णय; कारण…

जग्वार लँड रोव्हरला मिळालेलं कर्ज राज्य प्रायोजित असून पाच वर्षांसाठी मिळणार आहे.

जग्वार लँड रोव्हर कंपनीला ६७० मिलियन अमेरिकन डॉलर्सचं कर्ज देण्याचा निर्णय; कारण…
जग्वार लँड रोव्हर कंपनीला ६७० मिलियन अमेरिकन डॉलर्सचं कर्ज देण्याचा निर्णय; कारण… (Photo- Reuters)

ऑटो उत्पादक कंपन्यांनी गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे मोर्चा वळवला आहे. बाजारातील मागणी पाहता कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. आता जग्वार लँड रोव्हर कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्याकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. लवकरच वाहनांचा विकास आणि उत्पादन करण्यासाठी ६७० मिलियन अमेरिकन डॉलर्सचं राज्य प्रायोजित कर्ज मिळणार आहे. हे कर्ज पाच वर्षांसाठी असणार आहे. संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी तसेच देशाच्या निर्यात विकास हमी कार्यक्रमाचा भाग आहे, असं युकेच्या अर्थतज्ज्ञांनी सांगितलं आहे.

भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहता युकेच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्थानिक बॅटरी बनवण्याच्या उद्योगाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. २०३० पर्यंत अंतर्गत ज्वलन इंजिन वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा युकेचं उद्दिष्ट आहे. दुसरीकडे जग्वार लँड रोव्हर २०२५ पर्यंत पारंपरिक इंधनावर धावणाऱ्या गाड्यांचं उत्पादन बंद करणार आहे. तर २०२४ या वर्षात पहिलं पूर्ण इलेक्ट्रिक मॉडेल सादर केलं जाणार आहे. जॅग्वार लँड रोव्हरचं एक अधिक टिकाऊ वाहनं निर्मितीसाठी पावलं उचलत आहे. गेल्या वर्षी कंपनीने संपूर्ण पारदर्शकता आणि टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी डिजिटर पुरवठा साखळीत ब्लॉकचेन तंत्रज्ञानांचा वापर केला आहे. जीवनचक्रामध्ये पर्यावरणीय आणि नैतिक प्रभाव कमी करण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे. कंपनीने २०३९ पर्यंत पुरवठा साखळी, उत्पादने आणि ऑपरेशन्समध्ये निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याची आपली योजना व्यक्त केली आहे.

टाटा मोटर्सला मागच्या तिमाहीत तोटा; ‘या’ दोन कारणांमुळे बसला फटका

कंपनीने अलीकडेच तिसऱ्या तिमाहीतील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. मागील वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत किरकोळ विक्रीत ३७.६ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. असं असलं तरी ब्रँडचे उत्पादन प्रमाण अनुक्रमे ४१ टक्क्यांनी वाढले. जग्वार लँड रोव्हरची मूळ कंपनी टाटा मोटर्सने चालू असलेली सेमीकंडक्टर टंचाई आणि वस्तूंच्या वाढत्या किमती या तोट्यामागील घटक असल्याचे सांगितले आहे. “सेमीकंडक्टरची कमतरता २०२२ पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, पण पुरवठा बेसमधील क्षमता वाढल्याने हळूहळू सुधारणा अपेक्षित आहे,” असे त्यात नमूद केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2022 at 11:12 IST
Next Story
टाटा मोटर्सला मागच्या तिमाहीत तोटा; ‘या’ दोन कारणांमुळे बसला फटका