Jawa 42 Bobber launched in India | Loksatta

जावाची ‘ही’ दमदार दुचाकी बाजारपेठेत सादर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…

प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी जावाने नुकतीच आपली दुचाकी भारतीय बाजारात लाँच केली आहे.

जावाची ‘ही’ दमदार दुचाकी बाजारपेठेत सादर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…
Photo-financialexpress

प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी जावाने नुकतीच आपली दुचाकी बाजारात लाँच केली आहे. या दुचाकीचे नाव ‘जावा 42 बॉबर’ असे असून ही दुचाकी विविध नवीन फीचर्ससह बाजारात आणण्यात आलेली आहे. या दुचाकीला एकूण तीन रंगामध्ये ही बाजारात सादर करण्यात आले आहे. एक्सप्रेस ड्राईव्हशी बोलताना, कंपनीचे सीईओ आशिष सिंग जोशी, यांनी या दुचाकीच्या खास फिचर्सबद्दल माहिती दिली. तसेच डिसेंबर अखेरीस उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. चला तर मग जाणून घेऊया या दुचाकीच्या खास फिचर्स व किंमतीबद्दल.

फिचर्स

या नवीन बाईक मध्ये रायडिंगसाठी ABS कॅलिब्रेशन सुधारण्यात आले आहे. तसेच या बाईक मध्ये LED लाइटिंगसह LCD डिस्प्ले आहे. त्याचबरोबर बाईकच्या मागील बाजूस एक लहान लगेज रॅक देण्यात आलेले आहे.

आणखी वाचा : MG ने लाँच केली बाजारपेठेत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार;जाणून घ्या फीचर्स…

इंजिन

या दुचाकीला जावा ४२ दुचाकी प्रमाणेच डिझाईन करण्यात आलेले असून, ही दुचाकी नवीन रेट्रो रोडस्टर स्टाईलमध्ये आहे. या जावाच्या नवीन दुचाकीमध्ये ३३४ सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड कुल्ड इंजनसह सुसज्ज आहे. जे ३०.६४hp ची मॅक्झिमम पावर आणि ३२.६४ न्यूटन मीटर maximum टॉर्क निर्माण करते. या इंजिन सोबतच या दुचाकीमध्ये ६-स्पीड गिअर बॉक्स उपलब्ध आहे.

किंमत

या दुचाकीच्या रंगानुसार किमतीमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. मिस्टिक कॉपर रंगाच्या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत २.०६ लाख रुपये आहे, तर मुन स्टोन व्हाईट रंगाच्या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत २.०७ लाख रुपये आहे. त्याचबरोबर जास्पर रेड रंगाच्या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत २.०९ लाख रुपये एवढी आहे.

 

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Petrol-Diesel Price on 3 October 2022: पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा घसरले; जाणून घ्या नवी किंमत

संबंधित बातम्या

२० सेकंदात बाईकचा स्पीड १६ kmph वरुन ११४ kmph वर गेला अन् दोघांचा मृत्यू झाला; धक्कादायक घटनाक्रम हेल्मेट कॅमेरात कैद
सेकेंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करताय? आता ‘ही’ कंपनी विकणार सेकंड हँड कार; ४० हजार किंमीची वॉरंटीसह मिळणार बरंच काही
Tyre Tips: कार-बाईक चालवताय, रस्त्यावर सुसाट धावणार तुमची वाहने, ‘या’ टायर्सबद्दल माहितेय का? वाचा सविस्तर
पाच तासांत फडणवीस-शिंदेंचा ५३० किमी प्रवास; ‘समृद्धी महामार्गा’वर स्पीड लिमिट किती? सर्वसामान्यांना या वेगाने जाता येणार?
Car Discount Offers: वाहन प्रेमींसाठी आनंदाची बातमी! अर्ध्या किमतीत मिळतेय ‘ही’ लोकप्रिय कार; लगेच पाहा कुठे मिळतेय ही विशेष ऑफर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video : “कानफाड फोडेन, चल निघ” अपूर्वा नेमळेकरने मारण्यासाठी हात उगारताच विकास सावंत संतापला; भांडणाचा व्हिडीओ व्हायरल
“तुम्ही आहात तिथे…” वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीची पहिली पोस्ट, वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
“तुमची लायकी…”, JNU मधील ब्राह्मणविरोधी घोषणांवरून मनोज मुंतशिर-काँग्रेस नेत्यात बाचाबाची; सावरकरांचाही केला उल्लेख
उदय सामंत यांनी दिली जत तालुक्यातील गावांना भेट, स्थानिकांनी मांडल्या व्यथा!
सांगली: वाळवा तालुक्यात ऊसाच्या फडात आढळला जखमी रानगवा; उपचारानंतर नैसर्गिक आधिवासात सोडणार