अमेरिकेतील आघाडीची वाहन निर्माता कंपनी जीपने भारतात आपल्या ऑफ-रोड एसयूव्ही जीप कंपाचे नवीन वर्जन भारतात लॉन्च केले आहे. कंपनीने जीप कंपासच्या नवीन व्हेरिएंटला जीप कंपास नाईट ईगल असं नाव दिलं आहे.

Jeep India ने या SUV चे Night Eagle व्हेरिएंट काही कॉस्मेटिक बदलांसह बाजारात लॉन्च केले आहे, ज्यामध्ये या SUV ला आतून आणि बाहेरून चकचकीत काळा लुक देण्यात आला आहे. ग्रिल रिंग्स, ब्लॅक अलॉय व्हील, ब्लॅक रूफ रेल आणि ब्लॅक विंग मिरर सोबत, या एसयूव्हीला नाईट ईगल थीममध्ये सादर करण्यात आले आहे.

Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
mohammed abdul arfath,
एका महिन्यापासून अमेरिकेत बेपत्ता असलेला हैदराबादचा युवक मृतावस्थेत आढळला
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या

कंपनीने या नाईट ईगल व्हेरिएंटच्या लॉन्चिंगच्या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या एसयूव्हीची वाढती मागणी लक्षात घेऊन जीप कंपास नाईट ईगल प्रकार लॉन्च करण्यात आला आहे. यासोबतच, कंपनीने माहिती दिली आहे की या SUV चा प्रतीक्षा कालावधी सुमारे 4 महिने आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त प्रतीक्षा तिच्या Trailhawk व्हेरिएंटची आहे.

Jeep Compass Night Eagle Engine: जीप कंपास नाईट ईगल व्हेरिएंटच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्यात 2 लीटर डिझेल इंजिन आणि 1.4 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे.

त्याचे 2 लिटर इंजिन 7-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे, तर त्याचे 1.4-लिटर पेट्रोल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
जीप कंपास नाईट ईगलची फिचर: कंपनीने नाईट ईगल एडिशनमध्ये स्पेशल ट्रीटमेंट दिले आहेत. यात 10.1-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम असून 7-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.

यात ड्युअल ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, ऑल-स्पीड ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देखील मिळते.

आणखी वाचा : शानदार ऑफर! फक्त १९ ते २८ हजारांमध्ये मिळतेय Hero Super Splendor, वाचा ऑफर

यासोबतच कंपनीने या नाईट ईगल व्हेरिएंटमध्ये पियानो ब्लॅक ट्रीटमेंट दिली आहे ज्यामध्ये ब्लॅक सीट्स आणि लाइट टंगस्टन स्टिचिंगसह डोअर ट्रिम आहे.

Jeep Compass Night Eagle Rivals: भारतात लॉन्च केल्यानंतर ही जीप कंपास नाईट ईगल एडिशन त्याच्या विभागातील एमजी हेक्टर, ह्युंदाई टक्सन, टाटा हॅरियर आणि फोक्सवॅगन टिगन यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहे.

Jeep Compass Night Eagle Price: जीप इंडियाने हा जीप कंपास नाईट ईगल व्हेरिएंट भारतात लॉन्च केला आहे ज्याची सुरुवातीची किंमत 21.95 लाख रुपये आहे (एक्स-शोरूम) जी ऑन-रोड झाल्यानंतर वाढते.