Premium

दिल्लीनंतर आता ‘या’ राज्यातल्या महिला बसमधून मोफत प्रवास करू शकणार, सरकारची मोठी घोषणा

Karnataka Women Free Bus Travel :महिलांना बसमधून प्रवास करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अट नाही असे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.

Karnataka Woman free Travel from Government Buses
कर्नाटक राज्यात शासकीय बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार (Image Credit-Freepik)

Karnataka Government Bus free for Woman: काही दिवसांपूर्वीच कर्नाटक राज्याची विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष विजयी ठरला. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत. आता कर्नाटक राज्यातील कॉग्रेस सरकारने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटक ताज्या बातम्या: काँग्रेसशासित कर्नाटकात महिलांना आता सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी मंगळवारी (३० मे २०२३) या संदर्भात घोषणा केली. राज्यातील सर्व शासकीय बसमध्ये सर्व महिलांना मोफत प्रवास करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

”महिला सरकारी बसमधून मोफत प्रवास करू शकतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारची अट नाही. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात APL आणि BPL कार्डधारकांना लागू असलेल्या योजनेबाबत कोणतीही अट नमूद केलेली नाही. पूर्ण राज्यात महिला मोफत प्रवास करू शकतात.” असे रेड्डी म्हणाले. याबाबतचे वृत्त Zee News ने दिले आहे.

हेही वाचा : तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच करणार Elon Musk चीनचा दौरा, Tesla बाबत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता

परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी ही घोषणा पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर केली. तर त्यापूर्वी त्यांनी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ (KSRTC) च्या चार विभागांच्या AD सह बैठक घेतली होती. रामलिंगा रेड्डी म्हणाले, ”मी एमडीशी बोललो आहे आणि या योजनेच्या फायदा आणि नुकसान याबाबत चर्चा केली आहे. मी बैठकीतील अहवाल खर्च आणि इतर डिटेल्स ३१ मे (आज) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सादर करेन. मुख्यमंत्र्यांनी आधीच परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा केली आहे.”

रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, ”करोना महामारीच्या काळामध्ये झालेल्या नुकसानीबाबत देखील मी चर्चा केली आहे. KSRTC हे देशातील एक प्रतिष्ठित महामंडळ आहे. मंत्रालयाच्या अखत्यारीतील चार परिवहन महामंडळांना ३५० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. तसेच एकूण २४० युनिट काम करत आहेत.”

तसेच ते पुढे म्हणाले, केएसआरटीसीमध्ये एकूण २३,९७८ वाहनांचा समावेश आहे. त्यामध्ये एकूण १.०४ लाखांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. दररोज सरकारी बसमधून एकूण ८२.५१ लाख प्रवास करतात. त्यामधून २,३१,३३२ रुपयांचा महसूल मिळतो.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 13:53 IST
Next Story
तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच करणार Elon Musk ‘या’ देशाचा दौरा, Tesla बाबत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता