कावासाकी इंडियाने देशातील बाईक प्रेमींना मोठी भेट दिली आहे. कंपनीने आपली नवीन बाईक देशातील बाजारपेठेत दाखल केली आहे. कावासाकीने ‘Kawasaki Eliminator 500’ ही बाईक लाँँच केली आहे. या बाईकमध्ये कंपनीने अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. ही बाईक दिसायलाही स्टायलिश आहे. या बाईकमध्ये कंपनीने काय दिलं आहे खास. आपणही जाणून घेऊया…

कंपनीने या बाईकमध्ये गोल हेडलॅम्प, स्लीक फ्युएल टँक, एक्स्पोज्ड फ्रेम आणि शॉर्ट फेंडर्स यांसारखी फीचर्स दिली आहेत. व्हिज्युअल हायलाइट्सचा देखील समावेश आहे. सीटची उंची ७३५ मिमी आहे. लांब हँडलबार आणि मध्यभागी फूटपेगसह बाईक चालवणं आरामदायक असू शकते. हे स्प्लिट-सीट सेटअपसह येते. शक्तिशाली कावासाकी एलिमिनेटरमध्ये ४५१cc, लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन आहे, जे ४४bhp आणि ४२.६Nm आउटपुट तयार करते. हे इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लचद्वारे ६-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. एलिमिनेटर स्टील ट्रेलीस फ्रेमवर आधारित आहे, जे विशेषतः क्रूझर्ससाठी डिझाइन केलेले आहे.

Pune, nine year old boy, organ donation, brain dead, Ruby Hall Clinic, Sahyadri Hospital, Jupiter Hospital, liver transplant, kidney transplant, pancreas transplant, lung transplant, green corridor, , transplant surgeries,
पुणे : अवघ्या नऊ वर्षांचा चिमुरडा जाताना चार जणांना जीवदान देऊन गेला…
bhaindar uttan marathi news
भाईंदरच्या उत्तन येथील घटना, खड्ड्यात बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
Rape accused arrested after 22 years
भाईंदर : बलात्कारचा आरोपी २२ वर्षानंतर गजाआड
1993 riots, Accused, arrested, mumbai, riots,
१९९३ च्या दंगलीतील आरोपीला ३१ वर्षांनंतर अटक
32 thousand crores fundraising through ipo in six months boom in ipo
विश्लेषण : सहा महिन्यांत ३२ हजार कोटींची निधी उभारणी… आयपीओ बाजारातील तेजी कुठवर?
pregnant woman detected with zika in pune
पुण्यात झिकाचा धोका वाढला! गर्भवतीला संसर्ग; संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू
seven month old baby swallowed three keys the doctors of Rajawadi Hospital saved the babys life
सात महिन्याच्या बाळाने गिळल्या तीन चाव्या, राजावाडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वाचविले बाळाचे प्राण…
kalyan, Feeding Stray Dogs, Dog Loving Woman Threatened in kalyan, Dog Loving Woman Threatened with Death , Feeding Stray Dogs in kalyan, kalyan news, marathi news,
कल्याणमध्ये श्वानप्रेमी महिलेला नागरिकाची मारण्याची धमकी

(हे ही वाचा : गेल्या महिन्यात Royal Enfield च्या बाईककडे ग्राहकांनी फिरविली पाठ? ‘इतक्या’ टक्क्यांनी विक्रीत घसरण )

क्रूझरमध्ये १८ इंच फ्रंट आणि १६ इंच मागील अलॉय व्हील आहेत. ब्रेकिंगसाठी, ३१० mm फ्रंट आणि २४० mm रियर डिस्क ब्रेक दिले गेले आहेत, जे ड्युअल चॅनल ABS सह आहेत. एलिमिनेटरचे वजन १७६ किलो (कर्ब) आहे. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स १५० मिमी आहे. नवीन Kawasaki Eliminator 500 या बाईकच्या पुढील बाजूस १८-इंच अलॉय व्हील्स आणि मागील बाजूस १६-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. तसेच या बाईकला ड्युअल चॅनल ABS सोबत समोरच्या बाजूला ३१० mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस २४० mm डिस्क ब्रेक देण्यात आलेत. एलिमिनेटरला कावासाकीच्या राइडोलॉजी अॅपद्वारे सर्व-एलईडी दिवे, संपूर्ण डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी मिळते.

Kawasaki Eliminator बाईकची किंमत

मिळालेल्या महितीनुसार, Kawasaki Eliminator 500 या बाईकची एक्स शोरूम किंमत ५.६२ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. डिलिव्हरीही लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. भारतीय बाजारपेठेत ही बाईक थेट रॉयल एनफील्ड शॉटगन ६५० शी स्पर्धा करेल.