scorecardresearch

Keeway १५ सप्टेंबर रोजी भारतात सादर करणार दोन नवीन जबरदस्त मोटरसायकल; कंपनीने जारी केला मोटरसायकलचा टीझर

कीवे कंपनी बेनेली इंडियाच्या सहकार्याने आपली सर्व वाहने लाँच करत आहे. आपल्या आगामी मोटरसायकलचा टीझरही कंपनीने जारी केला आहे.

Keeway १५ सप्टेंबर रोजी भारतात सादर करणार दोन नवीन जबरदस्त मोटरसायकल; कंपनीने जारी केला मोटरसायकलचा टीझर
Photo : Keeway.com

हंगेरियन दुचाकी निर्माता कंपनी कीवे १५ सप्टेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत दोन नवीन मोटरसायकल सादर करणार आहे. मोटारसायकलींचे अधिकृत तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. नुकताच कंपनीने आपल्या आगामी मोटरसायकलचा टीझरही जारी केला आहे.

यापूर्वी कीवेने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या चार दुचाकी सादर केल्या आहेत, ज्यात मोटारसायकलसह स्कूटरचा समावेश आहे. नवीन मोटारसायकल लाँच झाल्यानंतर कंपनीच्या एकूण मॉडेल्ससह बाजारात उपलब्ध होणार आहे. भारतात, कंपनी बेनेली इंडियाच्या सहकार्याने आपली सर्व वाहने लाँच करत आहे.

(हे ही वाचा : कंपनीच्या मायलेजचा दावा करण्याच्या फंदात पडू नका! सीएनजी कार घेणे किती फायदेशीर आहे ‘हे’ जाणून घ्या )

टीझरनुसार, कंपनीच्या नेकेड स्ट्रीट फायटर मोटरसायकलला शार्प एलईडी हेडलाइट, गोल्डन यूएसडी फोर्क सस्पेंशन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, शार्प फ्युएल टँक डिझाइन आणि स्लिम बॅक डिझाइन देण्यात आले आहे. या बाईकमधील हेडलाइट आणि टर्न इंडिकेटर एलईडी मध्ये दिलेले आहेत, ज्यामुळे एलईडी मध्ये टेल लाईट देखील दिली जाऊ शकते.

कीवेच्या आगामी फुल फेअरिंग बाईकबद्दल सांगायचे तर, त्याच्या फ्रंट फेअरिंगला एलईडी हेडलाइटसह ट्विन एलईडी डीआरएल देण्यात आले आहे. या बाईकमध्ये क्लिप-ऑन-हँडल बार देण्यात आल्याचे टीझरमध्ये दिसून आले आहे. या बाइकमध्येही डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाईट आणि एलईडी टर्न इंडिकेटर दिले जाऊ शकतात. या बाईकच्या समोर गोल्डन यूएसडी फोर्क्स देखील देण्यात आले आहेत.

दोन्ही मोटरसायकलमध्ये समान क्षमतेची इंधन टाकी दिली जाऊ शकते. याशिवाय या दोन्हीमध्ये डिस्क ब्रेक, एबीएस, अलॉय व्हील आणि टायरचा आकार दिला जाऊ शकतो. मात्र, दोन्ही बाईकचे इंजिन डिटेल्स अजून शेअर केलेले नाहीत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Keeway india to launch two new motorcycles on 15 september pdb

ताज्या बातम्या