Kia Carnival Booking Open: भारतीय ऑटोमोबाईल हे क्षेत्र एवढे मोठे आहे की, त्यात आपल्या कारचा दबदबा राहावा यासाठी अनेक ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्या प्रयत्न करीत असतात. तसेच आपल्याकडे अशा अनेक परदेशी कार उत्पादक कंपन्या आहेत की, ज्यांनी या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यातीलच एक विदेशी कंपनी म्हणजे किया मोटर्स. ३ ऑक्टोबरला किया आपली नवीन Carnival कार लाँच करणार आहे. त्यासाठी कंपनीकडून तयारीही सुरू झाली आहे. आता कंपनीने नवीन कार्निवल एमपीव्हीचे बुकिंग सुरू केली आहे. नवीन Kia कार्निवलमध्ये कोणती फीचर्स असतील हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

Kia Carnival कलर ऑप्शन

Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती, स्कॉर्पिओ, टोयोटा इनोव्हा, बोलेरोला ही टाकले मागे
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Hyundai Venue Adventure Edition launch
Hyundai : शार्क-फिन अँटेना, डॅशकॅमसह बरीच फीचर्स; मार्केटमध्ये येतेय नवी SUV; किंमत फक्त…
Akshay Shinde Shot Dead Badlapur Sexual Assault Case Amit Thackeray Remark
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवरून अमित ठाकरेंच्या पोस्टने वेधलं लक्ष; फडणवीसांसह विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

नवीन कार्निव्हल फक्त एकाच पूर्ण लोड व्हेरियंटमध्ये लाँच केली जाईल. रंगपर्यायांबद्दल बोलायचे झाले, तर ही कार दोन किंवा तीन रंगांमध्ये उपलब्ध केली जाऊ शकते. त्यापैकी पांढरा व काळा हे दोन रंग अपेक्षित आहेत.

Kia Carnival फीचर्स

नवीन कार्निव्हल कार सादर होण्यापूर्वीच तिच्या सर्व फीचर्सची माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या लक्झरी MPV मध्ये अनेक उत्तम फीचर्स दिली जातील. त्यामध्ये ड्युअल सनरूफ, १२.३ इंच वक्र डिस्प्ले, ३६० डिग्री कॅमेरा, स्मार्ट पॉवर स्लायडिंग डोअर, मागील एलईडी कॉम्बिनेशन लॅम्प, फ्रंट एलईडी फॉग लॅम्प, १२ स्पीकर्ससह बोस प्रीमियम साउंड सिस्टीम, वायरलेस फोन चार्जर, हेड फीचर्स यांचा समावेश आहे. हेड-अप डिस्प्ले, १८ इंच अलॉय व्हील्स, तीन झोन फुली ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल, आठ एअरबॅग्ज इत्यादी फीचर्सचा समावेश आहे.

हेही वाचा >> Warivo CRX Electric Scooter: गुरुग्राम कंपनी Warivo ने लाँच केली हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर CRX; पाहा किंमत आणि फीचर्स

Kia Carnival : किंमत काय

भारतात सादर होणाऱ्या कार्निव्हलची किंमत सुमारे ४५ ते ५० लाख रुपयांपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. भारतात ती इनोव्हा हायक्रॉस आणि टोयोटा वेलफायरशी स्पर्धा करताना दिसणार आहे.