scorecardresearch

Premium

Kia India कंपनी कारच्या नव्या मॉडेलसाठी सज्ज; कारप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला

Kia India कंपनीनं भारतीय बाजारात आपला पाया भक्कम करण्यास सुरुवात केली आहे.

Kia_India_Seltos
Kia India कंपनी कारच्या नव्या मॉडेलसाठी सज्ज; कारप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला (Kia India Twitter)

Kia India कंपनीनं भारतीय बाजारात आपला पाया भक्कम करण्यास सुरुवात केली आहे. Kia India ने ऑक्टोबर महिन्यात इतक्या Seltos गाड्या विकल्या की, Hyundai Creta ला टॉप १० च्या लिस्टमधून बाहेर केलं. त्याचबरोबर भारतीय बाजारात कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्येही आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे भारतीय बाजाराचा अंदाज असल्याने कंपनी पुढच्या नवी गाडी लॉन्च करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे कारप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता ताणली गेली आहे. कंपनी एसयूव्ही मॉडेल बाजारात आणणार की, नव्या सेगमेंटमध्ये डाव लावणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. कंपनी डिसेंबर महिन्यात याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच पुढच्या वर्षी भारतीय बाजारात गाडी येईल असं सांगण्यात येत आहे.

“भारतात गाड्या विक्री आणि निर्मितीसाठी चांगली स्थिती आहे. कंपनी २०२२ पहिल्या तिमाहित आपली नवी गाडी बाजारात आणू शकते “, असं Kia India चे सीईओ ताए-जिन पार्क यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

Kia India कंपनी एमपीव्ही सेगमेंटमध्ये कार्निवल विक्री करत आहे. ही एक लक्झरी गाडी आहे. त्यामुळे नवी गाडी परवडणाऱ्या किंमतीत मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. Kia India ची नवी गाडी पेट्रोल आणि डिझेल दोन इंजिन ऑप्शनसह येऊ शकते. त्याचबरोबर अनेक नवे फिचर्स असतील, असा अंदाज बांधला जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kia india ready to launch new model in market rmt

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×