Kia India Sales January 2023: जानेवारी महिन्यामध्ये मारुती सुझुकीपासून महिंद्रा आणि अन्य कंपन्यांच्या दिसून येत आहे. त्यातच Kia या कार कंपनीसाठीदेखील जानेवारी महिना चांगला गेला आहे. किआ इंडियाने आपली जानेवारी २०२३ मधील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. या कंपनीची गेल्या महिन्यातील देशांतर्गत विक्री हि ४८ टक्क्यांनी वाढली असून त्यांनी २८,६३४ युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने १९,३१९ वाहनांची विक्री केली होती. कंपनीच्या या जानेवारी मधील यशामागे किआ इंडियाच्या एका एसयूव्हीचा सहभाग आहे.

गेल्या महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये किआ सेल्टोस आणि किआ सोनेट या मॉडेल्स अधिक मागणी मिळाल्यामुळे चांगली विक्री झाली असे किआ इंडियाने सांगितले. या कालावधीत अनुक्रमे १०,४७० आणि ९,२६१ इतक्या युनिट्सची विक्री झाली. यानंतर Carens चे ७,९०० युनिट्स आणि Carnival च्या १,००३ युनिट्सची विक्री झाली. Carens ची गेल्या महिन्यात झालेली विक्री ही आतापर्यंतची एका महिन्यातील सर्वात जास्त विक्री आहे असे कंपनीने सांगितले.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
RBI bank
रिझर्व्ह बँकेकडून का सुरू आहे सोने खरेदी? गव्हर्नर दास यांनी दिली ही कारणे…

हेही वाचा : फक्त १२ हजारांमध्ये घरी घेऊन या Suzuki ची ‘ही’ जबरदस्त स्कुटर; एका लिटरमध्ये धावणार…

आम्ही जानेवारी म्हणजेच २०२३ ची सुरुवातीला २८,६३४ युनिट्सची विक्री चांगल्या प्रकारे केली आहे. हे आमच्या उत्पादनाला मिळणाऱ्या चांगल्या मागणीला दर्शवते असे किआ इंडियाचे उपाध्यक्ष आणि विक्री व विपणन प्रमुख हरदीप सिंग ब्रार यांनी निवेदनात म्हटले आहे.

Kia Sonet- संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

याशिवाय Kia ने त्यांच्या भारतातील ४ वर्षांच्या प्रवासात ६.५ लाख कार विकण्याचा विक्रम केला आहे. या कंपनीने भारतात आपला व्यवसाय Seltos SUV सह सुरू केला होता. ही कर कंपनीची सर्वाधिक विक्री हणारी कार आहे. किआने जानेवारीपर्यंत भारतात सेलटॉसचे एकूण ३,५२,४३३ युनिट्स आणि सोनेटच्या २,१३, ११२ युनिट्सची विक्री केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर Carens कार असून, कंपनीने याच्या ७०,६५६ युनिट्सची विक्री केली आहे.