Premium

नवीन कार घेताय? मग घाई करा, पुढील महिन्याच्या १ तारखेपासून ‘या’ लोकप्रिय कार महागणार, किती पैसे मोजावे लागणारे?

जर तुम्ही सणासुदीत नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठा झटका बसणार आहे.

car Price Hike
'या' कारच्या किमतीत होणार वाढ (Photo-financialexpress)

सणासुदीच्या काळात मोठया संख्येने लोक कार खरेदी करण्याचा विचार करतात. अशा परिस्थितीत कंपन्या बाजारात अनेक प्रकारच्या ऑफर्स लाँच करतात, पण आता त्या उलट झाले आहे. ऐन सणासुदाच्या काळात भारतातील एका मोठ्या कार कंपनीने ग्राहकांना धक्का दिला आहे. ही कंपनी पुढील महिन्याच्या १ तारखेपासून आपल्या कारच्या किमतीत वाढ करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ कंपनीचे कार खरेदी करणे महागणार

किया मोटर्स इंडिया (Kia Motors India) भारतात सर्वात वेगाने कारची विक्री करणारी कंपनी आहे. कियाच्या कारला भारतात मोठी पसंती मिळते. पण आता Kia कार खरेदी करण्यासाठी, तुम्हाला पुढील महिन्याच्या १ तारखेपासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. वास्तविक, Kia India ने आपल्या Seltos आणि Carens मॉडेल्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Kia India १ ऑक्टोबरपासून आपल्या Seltos आणि Carens मॉडेल्सच्या किमती दोन टक्क्यांनी वाढवणार आहे, अशी माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

(हे ही वाचा : ५.९९ लाखाच्या ‘या’ मारुती कारनं ग्राहकांना लावलं वेड, छप्परफाड विक्रीमुळे वेटिंग पीरियड पोहोचला ‘इतक्या’ महिन्यांवर )

‘या’ कारच्या किमतीत वाढ होणार नाही

मात्र, कंपनीने आपल्या एंट्री लेव्हल मॉडेल सोनेटच्या किमतीत वाढ करणार नसल्याचे सांगितले आहे. किया इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख (विक्री आणि विपणन) हरदीप एस ब्रार यांनी सांगितले की, १ ऑक्टोबरपासून सेल्टोस आणि केरेन्सच्या किमती सुमारे दोन टक्क्यांनी वाढवणार आहोत. याआधी एप्रिलमध्ये कंपनीने रिअल ड्रायव्हिंग एमिशन्स (आरडीई) नुसार आपली वाहने अद्ययावत करताना किमतीत एक टक्का वाढ केली होती. Kia India भारतीय बाजारात इलेक्ट्रिक मॉडेल EV6 देखील विकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kia india says that it will increase the prices of seltos and carens by up to 2 percent from october 1 onwards pdb

First published on: 25-09-2023 at 19:01 IST
Next Story
५.९९ लाखाच्या ‘या’ मारुती कारनं ग्राहकांना लावलं वेड, छप्परफाड विक्रीमुळे वेटिंग पीरियड पोहोचला ‘इतक्या’ महिन्यांवर