दक्षिण कोरियातील आघाडीची ऑटोमेकर कंपनी कियाने नवी एसयूव्ही गाडीचे अनावरण केले आहे. एसयूव्ही पहिल्या गाड्यांच्या तुलनेत अधिक बोल्ड लुकसह आकर्षक दिसते. ५ डिसेंबरपर्यंत प्रदर्शनात निरो एसयूव्ही दिसणार आहे. ही गाडी एसयूव्हीच्या २०१९ हबानिरो कॉन्सेप्ट कारशी प्रेरित असल्याचं दिसतंय. नव्या निरो कारसाठी सिग्नेचर टायगर नोज ग्रिल रिडिझाइन केली गेली आहे. कारची फ्रंट ग्रिल आता हुडच्या खाली फेंडरपर्यंत पसरली आहे. यात हार्टबीट एलईडी डे टाइम रनिंग लाइट्स दिले आहेत. स्टायलिश आणि बोल्ड क्रॉसओवर लुक आणि हाय-टेक टू टोन बॉडीसह निरो आकर्षक दिसते. कारच्या मागच्या बाजूस बूमरँग टेललाइट्स देण्यात आलेत.

निरोच्या आतील भागातही अनेक मोठे बदल दिसतात. त्याचा नवीन डॅशबोर्ड Kia EV6 ची आठवण करून देणारा असेल. यात दुहेरी स्क्रीन आहे, जी दोन विभागांमध्ये विभागली गेली आहे. काउंटर प्रदर्शित करणारी पहिली स्क्रीन दुसऱ्या स्लॅबमध्ये उजवीकडे पसरलेली आहे, ती थोडीशी तिरकी आहे जी मल्टीमीडिया प्रणाली दर्शवते. निरोच्या आतील भागातही अनेक मोठे बदल दिसतात. त्याचा नवीन डॅशबोर्ड किया EV6 ची आठवण करून देणारा असेल. यात दुहेरी स्क्रीन आहे, जी दोन विभागांमध्ये विभागली गेली आहे.

सुझुकीने कटाना स्पोर्ट्स बाइक केली सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये

“किया जास्त टिकाऊ भविष्याचा दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत आहे. नवीन मोबिलिटी युगाच्या चळवळीत सामील होण्यासाठी प्रत्येकाला आमंत्रित करते. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून अनुकूल सामग्री, अ‍ॅडवांस्ड टेक्नोलॉजीचा वापर करत आहे. ग्राहकांच्या भविष्यातील गरजा यामुळे पूर्ण होणार आहे.”, असं किओचे अध्यक्ष आणि सीईओ हो सुंग सोंग यांनी सांगितलं. कियाने नवीन निरोच्या इंजिनच्या रेंजबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. तथापि, हे स्पष्ट आहे की एसयूव्ही हायब्रिड, प्लग-इन हायब्रिड किंवा इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल. पुढील वर्षाच्या उत्तरार्धात ते बाजारात येण्याची शक्यता आहे.