किया मोटर्स ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स असलेले मॉडेल्स बाजारात लॉन्च करत असते. आता किया मोटर्सने १ ऑक्टोबरपासून म्हणजे आजपासून काही मॉडेल्सच्या किंमती वाढवणार आहे. किया मोटर्स आपल्या सेलटॉस आणि Carens या दोन मॉडेल्सच्या किंमतीमध्ये वाढ करणार आहे. म्हणजेच हे दोन मॉडेल्स आजपासून महागणार आहेत. कंपनीने नुकतीच ही दोन्ही मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत अपडेटसह सादर केली होती. काही दिवसांपूर्वी सेलटॉस आणि कॅरेन्सच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती.
सणासुदीच्या काळामध्ये वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः ऑटो कंपन्या अशा काळामध्ये जास्त विक्री व्हावी म्हणून ग्राहकांना आकर्षक ऑफर आणि डिस्काउंट ऑफर्स प्रदान करत असतात. मात्र किया मोटर्सने किंमती ग्राहकांना धक्काच दिला आहे. दाक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी असणाऱ्या किया मोटर्सने जुलै महिन्याच्या सुरुवातीला सेलटॉसचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केले होते. ज्याची किंमत १०.८९ लाख ते १९. ८० लाख (एक्सशोरूम) रुपये ड्रामा आहे. कियाने स्मार्ट फिचर ADAS सह सुसज्ज असलेले GTX+ (S) आणि X-Line (S) हे दोन मॉडेल लॉन्च केले आहेत. ज्याची किंमत १९, ४० लाख ते १९.६० लाख (एक्सशोरूम) रुपये आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.




या महिन्यापासून कंपनी आपल्या मध्यम आकाराच्या एसयूव्हीच्या सर्व मॉडेल्सच्या किंमती २ टक्क्यांनी वाढवेल अशी अपेक्षा आहे. किंमतीत बदल झाल्यामुळे कारच्या फीचर्समध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही आहे. अपडेटेड किया सेलटॉस तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात १.५ लिटरचे नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, १.५ लिटरचे डिझेल आणि १.५ लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. ट्रान्समिशनसाठी इंजिनसह ६-स्पीड मॅन्युअल, VT, iMT, ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर, ७ -स्पीड DCT सारखे अनेक गिअरबॉक्स देण्यात आले आहेत.
किया Carens च्या किंमतीत देखील होणार वाढ
सेलटॉस शिवाय किया मोटर्स १ ऑक्टोबर म्हणजे आजपासून आपल्या MPV कॅरेन्सच्या किंमती देखील वाढवू शकते. किया मोटर्स कॅरेन्सच्या सर्व व्हेरिएंटच्या किंमती ५ टक्क्यांनी वाढवेल अशी अपेक्षा आहे. व्हेरिएंटनुसार , १० हजार ते ५० हजार या दरम्यान किंमती वाढण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात सध्या किया कॅरेन्सची किंमत १०. ४५ लाख ते १८.९५ लाख (एक्सशोरूम) रुपयांदरम्यान आहे. ही कार प्रीमियम, प्रेस्टिज प्लस, लक्झरी, लक्झरी (o) आणि लक्झरी प्लस या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये देखील सेलटॉस प्रमाणे तीन इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. ही MPV भारतीय बाजारात मारुती अर्टिगा, XL6, एमजी हेक्टर प्लस, ह्युंदाई Alcazar सारख्या गाड्यांना टक्कर देते.