scorecardresearch

७.७ लाखांच्या ‘या’ एसयूव्हीनं Seltos ला पछाडलं, खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा

Best Selling SUV: कार घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी वाचाच…

Kia Sonet
Kia Sonet बेस्ट सेलिंग कार (Photo-financialexpress)

Kia Sonet: Kia Motors च्या वाहनांना भारतीय बाजारपेठेत खूप पसंती दिली जाते. कंपनीने किआ सेल्टोसच्या रूपात आपले पहिले मॉडेल लाँच केले, ज्याला ग्राहकांनी भरभरून प्रेम दिले आहे. ही बऱ्याच काळापासून कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार आहे, परंतु आता स्वस्त एसयूव्हीने सेल्टोसला मागे टाकून सर्वाधिक विक्रीचा किताब पटकावला आहे. वास्तविक, कंपनीची Kia Sonet SUV ची प्रचंड विक्री होत आहे आणि ते कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल देखील आहे. फेब्रुवारीमध्ये या कारच्या विक्रीत ६० टक्के वाढ झाली आहे.

Kia Sonet बेस्ट सेलिंग कार

Kia Sonet ही कंपनीची फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये, ९,८३६ युनिट्स विकल्या गेल्या आहेत. एक वर्षापूर्वी फेब्रुवारीमध्ये केवळ ६,१५४ युनिट्सची विक्री झाली होती. अशाप्रकारे सॉनेटच्या विक्रीत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

त्याचवेळी, किआ सेल्टोस गेल्या महिन्यात दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. सेल्टोसने फेब्रुवारी २०२३ मध्ये ८,०१२ युनिट्सची विक्री केली आहे. एक वर्षापूर्वी फेब्रुवारीमध्ये केवळ ६,५७५ युनिट्सची विक्री झाली होती. अशाप्रकारे सेल्टोसच्या विक्रीत २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

(हे ही वाचा : रेल्वे रुळावरून धावली Mahindra Bolero SUV, व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही झाले थक्क, म्हणतात, “हीच खरी…”)

Kia Sonet किंमत आणि वैशिष्ट्ये

Kia Sonet च्या किंमती ७.७९ लाख रुपयांपासून सुरू होतात आणि १४.८९ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जातात. सोनेट ३९२ लीटर बूट स्पेस देते. Kia Sonnet ला तीन इंजिन पर्याय आहेत, १-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन (१२०PS/१७२Nm), १.२-लीटर पेट्रोल इंजिन (८३PS/११५Nm) आणि १.५-लीटर डिझेल युनिट (११५PS/२५०Nm) आहे.

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, सॉनेटमध्ये सिंगल-पेन सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, रीअर व्हेंटसह ऑटो एसी आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान समाविष्ट आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हवेशीर फ्रंट सीट्स आणि एअर प्युरिफायर यांचा समावेश आहे. हे Hyundai Venue, Tata Nexon, Mahindra XUV300, Renault Kiger, Nissan Magnite आणि Maruti Suzuki Brezza  सारख्या कारशी स्पर्धा करते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 17:13 IST

संबंधित बातम्या