इलेक्ट्रिक स्कूटरला पूर्ण चार्जिंगसाठी लागणार फक्त १.५ युनिट वीज; इतके किलोमीटर धावणार

स्कूटरला पूर्ण चार्ज करण्यासाठी फक्त १.५ युनिट वीज खर्च होते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

Komaki_SE
इलेक्ट्रिक स्कूटरला पूर्ण चार्जिंगसाठी लागणार फक्त १.५ युनिट वीज; इतके किलोमीटर धावणार (Photo- Komaki)

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरचा बोलबाला आहे. अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना गाडी खरेदीसाठी खूप सारे पर्याय आहेत. त्यामुळे ग्राहक फायदेशीर ठरणारी गाडी खरेदी करण्याकडे कल आहे. १४० किलोमीटरपर्यंत मॅक्सिमम रेंजसह इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आली आहे. या स्कूटरला पूर्ण चार्ज करण्यासाठी फक्त १.५ युनिट वीज खर्च होते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचं नाव Komaki SE आहे. ही स्कूटर स्पोर्टी लूकसह दमदार परफॉर्मन्स देखील देते. पूर्ण चार्ज केल्यावर स्कूटर १४० किमी अंतर कापेल असा कंपनीचा दावा आहे. तर किमान ९० किमी रेंज मिळते. स्कूटरला पूर्णपणे चार्ज करण्यासाठी फक्त १.५ युनिट वीज लागेल, असेही कंपनीचे म्हणणे आहे.

कोमाकी एसई स्कूटर गार्नेट रेड, डीप ब्लू, मेटॅलिक गोल्ड आणि जेट ब्लॅक या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्कूटरची किंमत ९६,००० रुपये (एक्स-शोरूम) आहे. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर याला एरोडायनामिक डिझाईन, एलईडी डीआरएल, फ्रंट आणि रियर टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि ड्युअल डिस्क ब्रेक मिळतात.

Volkswagan Tiguan भारतात ७ डिसेंबरला होणार लॉन्च; जाणून घ्या फिचर्स

यात इन-बिल्ट ब्लूटूथ स्पीकरसह मल्टीमीडिया कंट्रोल, फ्रंट यूएसबी चार्जिंग पोर्ट, रिमोट लॉकिंग आणि अँटी थेफ्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. स्कूटरमध्ये क्रूझ कंट्रोल आणि तीन वेगवेगळ्या राइडिंग मोड आहेत. ही स्कूटर पेट्रोल इंजिन असलेल्या १२५ सीसी स्कूटरइतकी शक्तिशाली आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे. या स्कूटरमध्ये स्व-निदान प्रणाली आहे. हे तंत्रज्ञान विद्युत समस्या शोधून स्वतःच निराकरण करते, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Komaki electric scooter will require only 1 5 units of electricity for full charging rmt

ताज्या बातम्या