scorecardresearch

कोमाकीने भारतात सादर केली आपली नवीन ‘व्हेनिस इको’ इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…

इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी कोमाकी (Komaki) ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘कोमाकी व्हेनिस इको’ भारतात सादर केली आहे.

कोमाकीने भारतात सादर केली आपली नवीन ‘व्हेनिस इको’ इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…
Photo-financialexpress

इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी कोमाकी (Komaki) ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘कोमाकी व्हेनिस इको’ भारतात सादर केली आहे. ही हाय स्पीड पण बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. चला तर मग या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, फीचर्स, रेंज, बॅटरी आणि स्पेसिफिकेशनचे तपशील जाणून घेऊया.

कोमाकी व्हेनिस इकोचे इंजिन

कोमाकी व्हेनिस इको इलेक्ट्रिक स्कूटर लिथियम फेरो फॉस्फेट (LiPO4) बॅटरीद्वारे समर्थित आहे. ही बॅटरी १०० किमी पर्यंतची रेंज देऊ शकते आणि ती पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.

तसेच, इलेक्ट्रिक स्कूटर प्रति चार्ज १.८ ते २ युनिट वापरते असा दावा करण्यात आला आहे. या पॉवरट्रेनसह, ते ब्रँडच्या ११ लो-स्पीड आणि सहा हाय-स्पीड इलेक्ट्रिक दुचाकींच्या लाइनअपमध्ये सामील होईल.

आणखी वाचा : वाहनप्रेमींमध्ये चर्चा ‘महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट’ची; जाणून घ्या फीचर्स आणि बरचं काही…

कोमाकी व्हेनिस इकोचे डिझाइन आणि वैशिष्ट्ये

डिझाइनसाठी, कोमाकी व्हेनिस इको इलेक्ट्रिक स्कूटर बॅकरेस्ट आणि रेट्रो स्टाइलमध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच, ब्रँडच्या उर्वरित मॉडेल्सप्रमाणे मेटल फ्रेमचा वापर केला गेला नाही.

वैशिष्ट्यांबद्दल, यात एक TFT डिस्प्ले आहे, जो मार्ग नेव्हिगेट करण्यासाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन सपोर्टसह येतो. तसेच, हा डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर म्हणून देखील काम करेल. यात सात वेगवेगळे रंग आहेत ज्यात केशरी, काळा, लाल, हिरवा आणि इतर रंगांचा समावेश आहे.

किंमत

कोमाकी व्हेनिस इको इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ७९,००० रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या