इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कोमाकी इलेक्ट्रिक व्हेहिकल्सने आपल्या दोन इलेक्ट्रिक वाहनांबद्दल अपडेट दिले आहेत. यात एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि दुसरी इलेक्ट्रिक बाइक यांचा समावेश आहे. बुधवारी आपल्या नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर व्हेनिसबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की, इलेक्ट्रिक स्कूटरच्या हाय-स्पीड पोर्टफोलिओमधील हे पाचवे मॉडेल असेल, जे नऊ वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केले जाईल. इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकलबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, ही एक स्टायलिश आणि हाय-स्पीड इलेक्ट्रिक बाइक असेल. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक वाहनांबद्दल…

कोमाकी व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटर

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

ही इलेक्ट्रिक स्कूटर या वर्षी भारतात लॉन्च करण्याची योजना आहे. अनेक रंगांच्या पर्यायांसह लॉन्च केली जाईल. कोमाकी व्हेनिसला अल्ट्रा-आधुनिक वैशिष्ट्ये आणि स्टायलिश लुक देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये अनेक सुविधाही देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ती विशेष आहे. इलेक्ट्रिक स्कूटर 72v40ah बॅटरी पॅक, पर्याप्त बसण्याची जागा आणि अतिरिक्त स्टोरेज बॉक्ससह येईल. या इलेक्ट्रिक स्कूटरला रिपेअर स्विच, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम, रिव्हर्स स्विच आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यासारखी आधुनिक वैशिष्ट्ये देखील मिळतात. कोमाकी कंपनीने व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटरच्या मायलेज आणि किंमतबाबत माहिती शेअर केलेली नाही. कंपनीचे म्हणणे आहे की या इलेक्ट्रिक स्कूटरचे इंजिन मजबूत बनवण्यावर भर दिला जात आहे. यासोबतच त्याची ड्रायव्हिंग रेंज आणि किंमतही लक्षात घेतली जात आहे.

Honda CB300R बाइक हाय-टेक फीचर्ससह भारतात लॉन्च, किंमत आणि फिचर्सबाबत जाणून घ्या

कोमाकी रेंजर इलेक्ट्रिक क्रूझर बाइक

कोमाकीने इलेक्ट्रिक स्कूटर सोबत आपली क्रूझर रेंजर बाईक सादर केली आहे. ४ किलोवॅट बॅटरी पॅकसह ५,००० W ची मोटर देणारी ही देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक असेल. एका चार्जवर सुमारे २५० किमी जाण्याचा दावा केला जातो. ही लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक बाइक असेल, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीचे संचालक गुंजन मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, कोमाकी रेंजर आणि कोमाकी व्हेनिस या दोघांमध्ये उत्कृष्ट मायलेज, आधुनिक तंत्रज्ञान असून पर्यावरणपूरक आहेत. भारतीय रस्त्यांसाठी योग्य असेल. आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणखी अनेक वाहने आणली जात असल्याचे कंपनीने सांगितले आहे.